केमिकलमिश्रित पाण्याचा वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:10 AM2021-03-13T05:10:10+5:302021-03-13T05:10:10+5:30
कराड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या आरसीसी गटरला साफसफाई करण्यासाठी ठिकठिकाणी चेंबर तयार केले आहेत. त्या चेंबरवर झाकणे टाकली होती. दर्जाहीन झाकणांमुळे येथील ...
कराड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या आरसीसी गटरला साफसफाई करण्यासाठी ठिकठिकाणी चेंबर तयार केले आहेत. त्या चेंबरवर झाकणे टाकली होती. दर्जाहीन झाकणांमुळे येथील मोरया काॅम्प्लेक्स ते ढेबेवाडी फाटा परिसरात तीन ठिकाणची झाकणे फुटून वर्ष उलटून गेले आहे. या ठिकाणची झाको फुटल्यामुळे नाल्यात दगड व मातीचा खच पडला आहे. त्यामुळेच या ठिकाणी नाला तुंबला आहे. शिवाय या उघड्या गटरमध्ये केमिकलमिश्रित पाणी साचल्याने घाण पाण्याचा उग्र वास येत आहे.
अनेक वर्षांपासून नालासफाई नाही
मलकापूर :
कराड-ढेबेवाडी रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या आरसीसी नाल्यांची देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. याचे सर्वाधिकार याच विभागाकडे आहेत; मात्र नाले निर्मितीपासून एकदाही या नाल्यांची साफसफाई केलेली नाही. त्यामुळे या परिसरात अनेक ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर नाल्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
रात्रीच्यावेळी नाल्यात कचरा
मलकापूर
कराड-ढेबेवाडी रस्त्याकडेला मोरया काॅम्प्लेक्स ते ढेबेवाडी फाटा परिसरात अनेक हातगाडाचालक चायनीज, भेळसारखे व्यवसाय करतात. त्यापैकी काही व्यावसायिक गाडा बंद करताना रात्रीच्यावेळी कोणी नसल्याचे पाहून सर्व कचरा नाल्यातच टाकतात. त्यामुळेच या भागात नाला तुंबून गटरमधील पाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे गटर तुंबली आहे.