दिवसाढवळ्या लाल सोन्याची तस्करी!

By admin | Published: May 22, 2015 11:10 PM2015-05-22T23:10:26+5:302015-05-23T00:33:32+5:30

प्रशासनाचे दुर्लक्ष : कास तलाव परिसरातील कृत्रिम खड्ड्यांत साचतोय कचरा

Smuggled red gold of the day! | दिवसाढवळ्या लाल सोन्याची तस्करी!

दिवसाढवळ्या लाल सोन्याची तस्करी!

Next


पेट्री : साताऱ्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवरील कासचे जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झाल्याचा अभिमान बाळगला जातोय, पण त्याचे जनत करताना प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. कास तलाव परिसरातून दिवसाढवळ्या ‘लाल सोन्या’ची तस्करी केली जात आहे. यामुळे पडलेल्या कृत्रिम खड्ड्यांमध्ये कचरा साचत असल्याने तलावातील पाणी धोक्यात आले आहे.
नैसर्गिक वारसा लाभलेल्या कास तलावाचे सौंदर्य लाल मातीमुळे उठून दिसत आहे. त्यामुळेच परिसरातील लाल मातीला जणू लाल सोन्याची उपमा दिली जाते.
या मातीच्या गुणधर्मामुळे नारळ, आंबा, फणस, सुपारी आदींचे चांगले उत्पादन मिळत आहे. तसेच सुशोभीकरणासाठीही लाल मातीला मोठी मागणी आहे.
मुबलक पाऊस, घनदाट झाडी, उंचसखल भाग यामुळे चित्रपटसृष्टीलाही भुरळ पडत असतानाच काही समाजकंठकांची दृष्ट लागायला लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून तलावालगतच्या जमिनीतील लाल मातीचे बेकायदेशीररीत्या उत्खनन केले जात आहे. यासाठी यंत्रांचाही वापर केला जात आहे. यामुळे तलाव परिसरात मोठ-मोठे खड्डे पडायला लागले आहेत.
तलाव परिसरात वारंवार होत असलेल्या ओल्या, सुक्या पार्ट्या, मद्यपींनी टाकलेल्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, पत्रावळ्यांबरोबरच असंख्य अविघटनशील वस्तू टाकले जात आहेत. यामुळचे खड्ड्यांत कचऱ्याचे ढीग साठत आहेत. पावसाळा काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. पावसाचे पाणी डोंगर उतारावरून तसेच खड्ड्यातील हा कचरा वाहून तलावातील पाण्यात मिसळला जाण्याची शक्यत आहे. यामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास तलावही दूषित होण्याचा धोका वाढला आहे.
परिसरात वेळोवेळी येणारे ट्रेकर्स, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी हा कचरा उचलतात. मात्र, पर्यावरणाच्या मुळावर उठलेल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पर्यावरण व महसूल विभागाने कडक पावले उचलावेत, अशी मागणी केली जात आहे. परिसरात फिरायला आल्यावर येथील रानमेव्याचा मनमुराद आनंद लुटता येतो.
परंतु, खड्डे पडून तेथील मातीचे उत्खनन झाल्याने करवंद, जांभूळ यासारख्या कित्येक वनस्पतींची हानी होत आहे. या खड्ड्यांतील कचऱ्याची विल्हेवाट नाही लावली तर नैसर्गिक सौंदर्य हरवून नाही बसलो तरच नवल. (वार्ताहर)


४पार्ट्या केल्यानंतर खड्ड्यात कचरा टाकला जातो. तर काही ठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेला दिसतो. परंतु, येथील उकरण्यात आलेल्या मातीचे काय? यासंबंधी प्रश्न अनुत्तरित आहेत. यासंदंर्भात वेळीच पावले नाही उचलले तर भविष्यात हे प्रमाण आणखी वाढू शकते.
पाण्यात पडलेल्या बाटल्या, ग्लास, प्लेट व अन्य प्लास्टिक वस्तू, थर्माकॉलच्या तुकड्यांमुळे भविष्यात पाण्यात किडे, अळ्या होण्याचा धोका असतो. तलाव परिसरात चालत असलेल्या ओल्या पार्ट्या रोखण्यासाठी कडक पावले उचण्यासाठी वेळीच सावध होण्याची गरज आहे.
- मुकेश जाधव, पर्यटक, सातारा.

Web Title: Smuggled red gold of the day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.