‘नारी फाउंडेशन’तर्फे शिवभक्तांना अल्पोपाहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:57 AM2021-02-23T04:57:15+5:302021-02-23T04:57:15+5:30
सातारा : शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी रात्री अकरापासून पहाटे पाचपर्यंत, साताऱ्यातील पोवई नाका येथे शिवतीर्थावर येणाऱ्या विविध जिल्ह्यांतील शिवभक्तांना ...
सातारा : शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी रात्री अकरापासून पहाटे पाचपर्यंत, साताऱ्यातील पोवई नाका येथे शिवतीर्थावर येणाऱ्या विविध जिल्ह्यांतील शिवभक्तांना पोटभर प्रसाद व पाणी मिळावे म्हणून नारीशक्ती फाउंडेशन, भाजप उद्योग आघाडी आणि जाणीव फाउंडेशनच्यावतीने सव्वाशे किलो उपमा आणि एक हजार बुंदीचे लाडू वाटण्यात आले. त्यामुळे दमून आलेल्या शिवभक्तांनी समाधान व्यक्त केले.
हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येणार असल्याचे सांगून नारी शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनिशा शहा यांनी सुनीता भोसले, आर. डी. भोसले, नीलेश शहा, कौशिक कुलकर्णी, प्रफुल्ल गुंदेजा, तनिश शहा, शैलेंद्र कांबळे, धनंजय कुलकर्णी व इतर सर्व संयोजकांचे आभार मानले. यासाठी साताऱ्यातील सुप्रसिद्ध वैद्य सुयोग्य दांडेकर यांचे सहकार्य लाभले.
फोटो
२१नारीशक्ती
साताऱ्यात येणाऱ्या शिवभक्तांना नारी फाउंडेशनच्यावतीने अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती. यावेळी सुनिशा शहा, सुनीता भोसले, आर. डी. भोसले उपस्थित होते.