..म्हणून जनतेने त्यांना घरी बसविले

By admin | Published: October 21, 2015 09:43 PM2015-10-21T21:43:26+5:302015-10-21T21:43:26+5:30

शंभूराज देसाई : पाटणकरांवर टीका; असा बेजबाबदार लोकप्रतिनिधी राज्यात सापडणार नाही

..so the people put them at home | ..म्हणून जनतेने त्यांना घरी बसविले

..म्हणून जनतेने त्यांना घरी बसविले

Next

पाटण : ‘तालुक्याच्या एक जबाबदार आमदार म्हणून व्याघ्रप्रकल्पबाधित जनतेशी चर्चा करून त्यांना जशा हव्या तशाच हरकती दि. २२ जून रोजी व्याघ्र समितीचा सदस्य म्हणून सल्लागार समितीकडे पाठविल्या आहेत; पण पाटणकर पाच वर्षे केवळ झोपा काढल्या आणि आमदारकीच्या शेवटच्या वर्षात म्हणजे दि. २० आॅगस्ट २०१४ रोजी तुमच्या हरकती दिल्या. मग बेजबाबदार कोण मी का तुम्ही आणि तुम्ही २६ वर्षे बेजबाबदार वागलात म्हणून पाटणच्या जनतेने तुमच्यावरील राग व्यक्त करून तुमच्या पुत्राला १८,८२४ इतक्या मतांनी नाकारले म्हणजेच तुम्हाला घरी बसविले,’ असा प्रतिहल्ला आमदार शंभूराज देसाई यांनी केला.
आमदार देसाई यांचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बेजबाबदार म्हणणारे पाटणकर किती निष्क्रिय लोकप्रतिनिधी होते, याची अनेक उदाहरणे आहेत.
परंतु मी त्याचे राजकीय भांडवल करत नाही; मात्र व्याघ्र प्रकल्पबाबत खाली घेतलेल्या पाटणकरांना मी बेजबाबदार दिसत असेन, त्यांच्याऐवढा बेजबादार लोकप्रतिनिधी उभ्या महाराष्ट्रात सापडणार नाही.
व्याघ्रप्रकल्पातील केवळ बफर झोनमधीलच नाहीत, तर कोअर झोनमधील जाचक अटी आणि लादलेली बंधने रद्द करा आणि
कोअर झोनमधील गावांचे पुनर्वसन करा. देसाई म्हणाले, याकरिता मी मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्रप्रकल्प कोल्हापूर यांच्याकडे पाठविल्या आहेत. माझ्या तोंडी नको ती वक्तव्ये टाकून स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न कराल तर जनता सुज्ञ आहे. हे तुम्हाला माहीतच आहे. (प्रतिनिधी)

बफर झोनमध्ये ऐवढं काय दडलंय..
शेवटच्या महिन्यात म्हणजे दि. २० आॅगस्ट २०१४ रोजी पाटणकरांनी हरकती दिल्या. त्यापूर्वी २००९ ते २०१४ या कालावधीत पाटणकर आमदार राहिले. मग या काळात काय केले? आणि पाटणकरांच्या
केवळ ‘बफर झोन’संदर्भात हरकती आहेत. ‘कोअर झोन’च्या का नाहीत? मी दिलेल्या हरकतीमध्ये जनतेला यातून वगळा, पवनचक्की किंवा रिसॉर्ट मालकांना वगळा असा उल्लेख नाही, असे देसाई
म्हणतात.

Web Title: ..so the people put them at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.