रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:00+5:302021-07-15T04:27:00+5:30
कुडाळ : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त स्वामी मंगल कार्यालय, कुडाळ (ता. जावळी) याठिकाणी ‘लोकमत’च्या माध्यमातून ...
कुडाळ : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त स्वामी मंगल कार्यालय, कुडाळ (ता. जावळी) याठिकाणी ‘लोकमत’च्या माध्यमातून व विकास सेवा सोसायटी, कुडाळ, सौरभबाबा शिंदे युवा मंच व ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ, कुडाळ यांच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
कुडाळ येथील स्वामी मंगल कार्यालयात कुडाळच्या सरपंच सुरेखाताई कुंभार, जावळीचे उपसभापती सौरभ शिंदे, पंचायत समिती सदस्य अरुणाताई शिर्के, प्रतापगड कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे, विकास सेवा सोसायटी उपाध्यक्ष दत्तात्रय रासकर, ग्रामपंचायत सदस्य धनंजय शिंदे, सोसायटी सदस्य अमोल शिंदे, सुदाम मोरे, सचिन मदने, महेश पवार, समीर आतार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उदघाटन झाले.
उपसरपंच सोमनाथ कदम, युवा कार्यकर्ते आशिष रासकर यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून रक्ताची कमतरता लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कुडाळ येथील विविध मंडळांचे सदस्य, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील ग्रामस्थ, शिक्षक आदींनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व जोपासले. कोरोनाच्या परिस्थितीत योग्य ती खबरदारी घेत या रक्तदान शिबिराचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. याकरिता येथील डॉ. प्रमोद जंगम यांनी आपला हॉल उपलब्ध करून दिला.
रक्तदाते : ए गट : डॉ. प्रमोद जंगम, राजेंद्र भिलारे, दत्तात्रय शिंगटे, दीपाली कुंभार, अजिंक्य पवार, विशाल जाधव
बी गट : नीलेश पवार, सुनील मोहिते, प्रताप तरडे, योगेश नवले, दिनकर पवार, शरद पांडगळे, दत्तात्रय रासकर, प्रमोद शिर्के, महादेव शिंदे, विजय शिर्के, स्वप्नील गोरेगावकर
एबी गट : अमोल शिंदे, समीर आतार, विशाल जमदाडे, रणजित कदम
ओ गट : साहिल जंगम, राजेंद्र वाघ, नितीन मोहिते, अजय शिर्के, बन्सीधार राक्षे, दिनेश गायकवाड, अतुल बोराटे, स्वप्नील दरेकर, कल्याण बोराटे, ओमकार सपकाळ, गणेश बारटक्के
फोटो : कुडाळ येथील रक्तदान शिबिरात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.