फलटणमधील रक्तदान शिबिराला सामाजिक संस्थांचा हातभार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:47 AM2021-07-07T04:47:32+5:302021-07-07T04:47:32+5:30
फलटण : ‘लोकमत’तर्फे फलटण येथे महाराजा मंगल कार्यालयात झालेल्या रक्तदान शिबिरात विविध सामाजिक संघटनांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन रक्तदानाच्या उपक्रमास ...
फलटण : ‘लोकमत’तर्फे फलटण येथे महाराजा मंगल कार्यालयात झालेल्या रक्तदान शिबिरात विविध सामाजिक संघटनांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन रक्तदानाच्या उपक्रमास हातभार लावला.
येथील अहद सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष मेहबूब मेटकरी यांनी रक्तदान शिबिरात तरुण वर्गाने सहभागी व्हावे यासाठी मोठी जनजागृती केली. अहद सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिरात प्रत्यक्ष सहभाग दर्शविला. रक्तदान शिबिरात सहभागी प्रत्येक रक्तदात्याचा स्वतः मेहबूबभाई मेटकरी यांनी सत्कार केला. या उपक्रमाचे भाजप तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक हेमंत निंबाळकर, माजी प्राचार्य अजीज शेख, बाळासाहेब मेटकरी, रियाजभाई मेटकरी, हमीदभाई मेटकरी, विजय जाधव, सादिक बागवान, मुश्ताक कोतवाल, सिकंदर डांगे, आमीरभाई शेख, ताजुद्दीन बागवान, सदाशिवराव जगदाळे, प्रीतम जगदाळे, सैफ शेख, अतुल मोहोळकर, कदीर मुजावर, समीर तांबोळी यांनी कौतुक केले.
‘लोकमत’तर्फे आयोजित रक्तदान शिबिरातील प्रत्येक रकदात्यास क्रांतिसूर्य प्रतिष्ठान व मायभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष मिलिंद नेवसे आणि नगराध्यक्षा नीताताई नेवसे यांनी मास्क, सॅनिटायजर, हँडवॉश, व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांचे आरोग्य किट दिले. यासाठी त्यांनी स्वतंत्र स्टॉल लावला होता. याठिकाणी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, सहायक निबंधक सुनील धायगुडे, नगरसेविका वैशाली चोरमले, रेल्वे सल्लागार समिती सदस्या वैशाली शिंदे, व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिगंबर कुमठेकर यांनी भेट देऊन कौतुक केले.
०५अहद
फलटणमध्ये अहद सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून रक्तदात्यांच्या सत्कारप्रसंगी मेहबूबभाई मेटकरी, अजीज शेख, बाळासाहेब मेटकरी, सादिकभाई बागवान, आमीरभाई शेख, समीर तांबोळी विजय जाधव उपस्थित होते.
०५मायभूमी
फलटण येथे मायभूमी फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमास तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, नगराध्यक्षा नीताताई नेवसे, मिलिंद नेवसे, तुकाराम गायकवाड, संतोष भोगशेट्टी, बजरंग गावडे, अशोकराव जाधव आदी उपस्थित होते.