वाळूचे ढीग जप्त करता मातीही मिळे..! Vजावळी तालुक्यात दुर्लक्ष : महसूल विभागाची तत्काळ कारवाई; लिलावास मात्र विलंब, आदेशाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:12 AM2017-12-28T01:12:20+5:302017-12-28T01:12:26+5:30
सायगाव : जावळी तालुक्यातील कारवाईतील वाळू जप्त करून पोलिसांकडे देखरेखीसाठी स्वाधीन केली जाते.
सायगाव : जावळी तालुक्यातील कारवाईतील वाळू जप्त करून पोलिसांकडे देखरेखीसाठी स्वाधीन केली जाते. अशी कारवाईची वाळू अनेक महिन्यांपासून पोलिस स्टेशनच्या आवारात पडून राहिल्यामुळे तिची अक्षरश: माती झाली आहे. लिलावासाठी जिल्हा महसूल प्रशासनाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत
ही वाळू असून, तिचा तत्काळलिलाव व्हावा, अशी मागणी होत आहे.जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे यांनी अवैध वाळूवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या आदेशान्वये वाळू उपसा बंद असून, चोरट्या वाळूवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना महसूलला देण्यात आलेल्या
आहेत. त्यामुळे वाळूसम्राटाचे धाबे दणाणले असून, वाळूला अगदी सोन्याचा भाव आला आहे. कारवायांमुळे वाळूचा तुटवडा निर्माण होऊन खासगी तसेच शासकीय बांधकामे रखडली आहेत. त्यातूनही रात्रीच्या दरम्यान, चोरटी वाळू वाहतूक होऊन किमान आवश्यक कामासाठी वाळू उपलब्ध करण्याचा प्रयत्न बांधकाम व्यावसायिकांकडून होताना दिसत आहे.
अशी चोरटी वाहतूक महसूल विभागाच्या निदर्शनास आली की तत्काळ कारवाई केली जात आहे. जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे यांनी जवळपास २५ पेक्षा अधिक ब्रास वाळू कारवाईत जप्त केली आहे. ही वाळू मेढा पोलिसांच्या ताब्यात देखरेखीसाठी देण्यात आली आहे.
त्यामुळे पोलिस स्टेशनच्या आवारात वाळूचे ढिगारे दिसत आहेत. गेले कित्येक महिने ही वाळू पडून असल्यामुळे तिची अक्षरश: ‘माती’ होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी तत्काळ लिलाव करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, पोलिस ठाण्याच्या आवारातील वाळूच्या ढिगाºयामुळे सर्वांनाच त्रास होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
श्तालुक्यातील शासकीय कामे रखडली...
महसूल विभागाने कारवाई करून जप्त केलेली वाळू कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासकीय कामे घेणाºया ठेकेदारांना लिलाव पद्धतीने ती द्यावी, असा नियम आहे. मात्र, महसूल विभाग केवळ कारवाईवर धडाका लावून लिलावकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. वाळूअभावी तालुक्यातील शासकीय कामे रखडली असून, मार्चअखेर कामे पूर्ण न केल्यास बिले कशी निघणार? या विचारात ठेकेदार आहेत. त्यामुळे महसूल विभागाने तत्काळ लिलाव प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.
ढिगाºयांमुळे कामकाजात अडसर...
सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी स्वच्छ सुंदर पोलिस स्टेशन करण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये हे जप्त केलेले वाळूचे ढिगारे कामकाज करताना अडसर ठरत आहेत. सध्या तर केवळ या वाळूची रखवालदारी पोलिसांना करावी लागत आहे.
मेढा पोलिस स्टेशनच्या आवारात अनेक महिन्यांपासून जप्त करुन ठेवलेल्या वाळूची माती होऊ लागली आहे.