मातीचे आरोग्य राखणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:34 AM2021-03-15T04:34:43+5:302021-03-15T04:34:43+5:30

पार्ले, ता. कऱ्हाड येथे कृषी मंडलाच्या वतीने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्यपत्रिका कार्यक्रमात ते बोलत होते. सरपंच अश्विनी ...

Soil health needs to be maintained! | मातीचे आरोग्य राखणे गरजेचे!

मातीचे आरोग्य राखणे गरजेचे!

Next

पार्ले, ता. कऱ्हाड येथे कृषी मंडलाच्या वतीने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्यपत्रिका कार्यक्रमात ते बोलत होते. सरपंच अश्विनी मदने, उपसरपंच मोहनराव पवार, सचिन नलवडे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश नलवडे, माजी सरपंच बाळासाहेब नलवडे, सैदापूर मंडल अधिकारी विनय कदम, कृषी सहायक मनीषा कुंभार, प्रा. विजय पाटील, आनंदराव नलवडे, रघुनाथ नलवडे, अप्पासाहेब पाटील, सुभाष नलवडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

प्रा. अमृत पाटील म्हणाले, शेतीतील मृदा आरोग्य टिकवण्यासाठी ठरावीक काळानंतर तीचे परीक्षण करणे गरजेचे आहे. मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक असे तीन गुणधर्म असतात. त्यामध्ये पन्नास टक्के भौतिक गुणधर्म असतात, तर रासायनिक पंचेचाळीस टक्के असतात. जैविक गुणधर्म केवळ पाच टक्के असतात. मातीमध्ये केवळ पाच सेंद्रिय घटक असतात. अलीकडच्या काळात रासायनिक खतांच्या मात्रा वाढत चालल्यामुळे मातीतील सेंद्रिय गुणधर्म कमी होत आहेत. मातीचा पोत बिघडत आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांचा आणि मर्यादित पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे.

यावेळी माती परीक्षणाबाबत माहिती देण्यात आली. तसेच माती तपासणी करण्यासाठी नमुना घ्यावयाच्या पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. विजय पाटील यांनी शेतीची मशागत आणि पिकांची लागवड त्यासाठी करावी लागणारी बीजप्रक्रिया याबाबत माहिती दिली. सैदापूर मंडल अधिकारी विनय पाटील यांनी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. प्रा. विनय पाटील यांनी प्रास्ताविक केले. अविनाश नलवडे यांनी आभार मानले.

फोटो : १४केआरडी०१

कॅप्शन : पार्ले, ता. कऱ्हाड येथे शेती आणि माती याविषयी प्रा. अमृत पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: Soil health needs to be maintained!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.