विजेचा धक्का लागून जवानाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 06:26 PM2020-09-02T18:26:04+5:302020-09-02T18:28:42+5:30
पुसेगाव : रणसिंगवाडी ता. खटाव येथील गोपीचंद दत्तात्रय रणसिंग ( वय ५१ ) हे शेतातील इलेक्ट्रिक मोटर चालू करण्यासाठी ...
पुसेगाव : रणसिंगवाडी ता. खटाव येथील गोपीचंद दत्तात्रय रणसिंग ( वय ५१ ) हे शेतातील इलेक्ट्रिक मोटर चालू करण्यासाठी गेलेले असताना शॉक लागून मृत्यूमुखी पडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपीचंद रणसिंग हे सीआरपीएफ मध्ये जम्मू काश्मीर पुलवामा येथे कर्त्यव्यावर होते. ते गेल्या दीड महिन्यापासून रजेवर रणसिंगवाडी ता. खटाव येथे आलेले होते. मंगळवारी, दि १ रोजी गणपती विसर्जन करून बुुुधवारी कांदा लाागण असल्याने ते मळवी नावाच्या शिवारातील शेतात टाकलेल कांद्याचे रोप भिजवण्यासाठी विहिरी वरील इलेक्ट्रिक मोटर चालू करणेस गेले असता शॉक लागून बेशुद्ध झाले.
त्यांचा मुलगा अजित याने जवळपास असलेल्या लोकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी तातडीने पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी आदित्य गुजर यांनी तपासून ते मयत झालेचे सांगितले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, एक मुलगा, सून नातवंडे व आई वडील असा परिवार आहे. या घटनेची आकस्मित मृत्यू नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक सचिन माने अधिक तपास करत आहेत.