गावाकडे सुटीसाठी आलेल्या जवानाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:05 AM2021-05-05T05:05:06+5:302021-05-05T05:05:06+5:30
दहिवडी : सैन्यात कर्तव्य बजावत असलेले राणंद (ता. माण) येथील प्रशांत रामहरी घनवट (वय ३०) हे सुटीसाठी गावे आले ...
दहिवडी : सैन्यात कर्तव्य बजावत असलेले राणंद (ता. माण) येथील प्रशांत रामहरी घनवट (वय ३०) हे सुटीसाठी गावे आले आहेत. त्यांचा सोमवारी पोहताना बुडून मृत्यू झाला. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रशांत रामहरी घनवट हे दहा वर्षांपासून सैन्यात कार्यरत होते. ते ९ एप्रिलला सुटीसाठी गावी आले होते. सोमवारी घरातून दुपारी एकच्या सुमारास इनाम नावचे शिवारात विहिरीवर पोहोण्यासाठी गेले होते. त्यावेळी संजय घनवट हे विहिरीवर दुपारी सव्वा एकच्या सुमारास त्यांच्या मुलांना पोहायला शिकवत होते. या दरम्यान प्रशांत घनवट ही त्याठिकाणी पोहण्यासाठी आले होते. विहिरीच्या पाण्यात उडी मारल्यानंतर ते बुडू लागल्याचे दिसताच संजय घनवट यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु ते पाण्यात बुडाले होते.
त्यानंतर संजय घनवट यांनी विहिरीवर येऊन आरडाओरडा करून लोकांना जमा केले. त्यानंतर प्रशांत यांना पाण्यातून विहिरीच्या काठावर काढले. त्यावेळी ते बेशुद्धच होते. उपचारासाठी दहिवडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे सांगितले. त्यांच्या मागे वडील, आई, भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे. सहायक पोलिस निरीक्षक आर. पी. भुजबळ तपास करत आहेत.
फोटो ०४प्रशांत घनवट