अरबी अन् संस्कृत भाषेतून पावसासाठी याचना
By Admin | Published: July 5, 2014 12:43 AM2014-07-05T00:43:52+5:302014-07-05T00:46:05+5:30
कवठे : युवकांनी पेटवली लाकडाची होळी
कवठे : पाऊस पडावा म्हणून ग्रामस्थ वेगवेगळ्या देवांची याचना करीत आहेत. आता पावसासाठी शाळाही पुढे सरसावल्या आहेत. यशवंत शिक्षण संस्थेच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री विद्यालय वाई येथे पावसासाठी सर्वधर्म प्रार्थना करण्यात आली. संस्कृतचे गाढे अभ्यासक व तपस्वी कालिदास सहकारी यांनी ‘वरुण अवाहनम’ मंत्राचे पठण केले तर ऊर्दू कन्या शाळा प्राचार्य शेख मोहम्मद सादकासमी यांनी अरबी भाषेतून वरुणराजाला प्राणी, पक्षी, मानव व शेतकऱ्यासाठी पावसाची याचना केली.
विद्यार्थी व शिक्षकांनी कलशपूजन करून पुष्पांजली वाहिली. पर्यवेक्षक रवींद्र शिंदे यांनी स्वागत केले. जावेदखान मोकाशी यांनी प्रास्ताविक केले.
या उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव अरविंद चव्हाण, संचालक प्रताप यादव, अॅड. ललित चव्हाण, मुख्याध्यापिका कमल भोसले, मथुरा साळुंखे यांनी सर्वांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे हणमंत वैराट, तुषार चव्हाण, एन. के. शिंदे यांनी नियोजन केले. (वार्ताहर)