महामार्गाच्या समस्या तातडीने सोडवा

By admin | Published: November 19, 2014 09:54 PM2014-11-19T21:54:21+5:302014-11-19T23:28:05+5:30

शिवेंद्रसिंंहराजे : सेवारस्ते पुरविण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Solve the problem of the highway promptly | महामार्गाच्या समस्या तातडीने सोडवा

महामार्गाच्या समस्या तातडीने सोडवा

Next

सातारा : पुणे-बंगळूर महामार्गाची शेंद्रे ते पाचवडदरम्यान दुर्दशा झाली आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. वाहनचालक आणि नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. या मार्गाची दुरुस्ती, सेवा रस्ते आदी समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
आ. शिवेंद्रसिंंहराजे यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण, नगराध्यक्ष सचिन सारस, नगरसेवक अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, भाग्यवंत कुंभार, प्रवीण पाटील, दीपलक्ष्मी नाईक यांच्यासह संजय घोरपडे, मनोहर साळुंखे, जयराम चव्हाण उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंंहराजे म्हणाले, शेंद्रे ‘महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. महामार्गालगत असलेल्या गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी सेवारस्ते नसल्याने त्यांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने वारंवार अपघात होत आहेत. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी.’ (प्रतिनिधी)

शेतकऱ्यांना मदत द्या
गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे सातारा आणि जावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी आ.शिवेंद्रसिंंहराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Web Title: Solve the problem of the highway promptly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.