करिअरमध्ये काही गोष्टी एकदाच येतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 04:06 AM2021-01-05T04:06:23+5:302021-01-05T04:06:23+5:30

फलटण : ‘करिअरमध्ये काही गोष्टी एकदाच येतात, ती संधी घेऊन एखादा वेगळा विषय समोर येतो, त्यावेळी आपल्या पदाला न्याय ...

Some things in a career come at once! | करिअरमध्ये काही गोष्टी एकदाच येतात!

करिअरमध्ये काही गोष्टी एकदाच येतात!

Next

फलटण : ‘करिअरमध्ये काही गोष्टी एकदाच येतात, ती संधी घेऊन एखादा वेगळा विषय समोर येतो, त्यावेळी आपल्या पदाला न्याय देऊन, प्रसंगी चाकोरीबाहेर जाऊन केलेल्या कामाचा निश्चित फायदा होईल, याची ग्वाही देत अशा कामातून आपली योग्यता, प्रतिष्ठा, मानसन्मान वाढवा,’ असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी तालुक्यातील पोलीस पाटलांना केले.

फलटण तालुका पोलीस पाटील संघाच्यावतीने ५३ व्या पोलीस पाटील दिनानिमित्ताने फलटण नगर परिषद सभागृहात आयोजित मार्गदर्शन शिबिर व वर्धापन दिन अशा संयुक्त कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन सावंत, लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रावळ, निवृत्त नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे, अरविंद मेहता, सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

प्रशासनातील महसूल मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, बीट अंमलदार, पोलीस पाटील ही मंडळी ग्रामपातळीवर प्रशासनाचे कान, नाक, डोळे म्हणून काम करतात; परंतु त्यापैकी केवळ पोलीस पाटील गावात राहणारा आणि संपूर्ण गावाची माहिती असणारा प्रशासनातील महत्त्वाचा घटक असल्याचे नमूद करीत कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या कालावधित गावाशी सतत संपर्काची आवश्यकता असताना आपल्यासमोर पोलीसपाटील हा एकच कर्मचारी असल्याचे दिसून आल्यानंतर आपण त्यांना अनेक कामे सांगितली.

ग्रामसुरक्षा दल अधिक सक्षम असण्याची आवश्यकता नमूद करीत त्यासाठी तसेच बदलत्या परिस्थितीत सीसीटीव्ही ही सुरक्षेसाठी आवश्यक बाब झाल्याचे नमूद करीत ग्रामपंचायत किंवा अन्य संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक गावात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले.

चौकट...

‘पोलीसपाटील हा सतत गावात राहणारा आणि बदलून न जाणारा एकमेव शासकीय कर्मचारी आहे. त्यामुळे गावासह परिसराची माहिती, लोकांचे प्रश्न, संघर्षाचे विषय वगैरे सर्व गोष्टी त्याला ज्ञात असल्याने तो कायदा, सुव्यवस्था, परिस्थिती उत्तमप्रकारे नियंत्रणात ठेवू शकतो. म्हणून प्रशासन व पोलीस यंत्रणा या घटकांवर अधिक विसंबून राहते, असे तहसीलदार समीर यादव यांनी सांगितले.’

०४ फलटण पोलीस पाटील

फलटण येथे पोलीसपाटील दिनानिमित्त प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार समीर यादव, तानाजी बरडे, प्रसाद काटकर आदी उपस्थित होते.

Web Title: Some things in a career come at once!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.