नगरसेविकेच्या मुलाला तडीपारी उल्लंघनप्रकरणी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 04:11 PM2018-11-19T16:11:11+5:302018-11-19T16:11:42+5:30
तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी नगरसेविका संगीता आवळे यांचा मुलगा अमर श्रीरंग आवळे (वय २९, रा. बुधवार पेठ, सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली.
सातारा : तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी नगरसेविका संगीता आवळे यांचा मुलगा अमर श्रीरंग आवळे (वय २९, रा. बुधवार पेठ, सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली.
याबाबत माहिती अशी की, अमर आवळे याच्यावर गर्दीत मारामारी, मटका आणि जुगार आदी गुन्हे दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्याचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करून तत्कालीन पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. त्यास त्यांनी मंजुरी देत सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते.
तडीपार आदेशाचे उल्लंघन करून तो रविवारी रात्री बुधवार नाका परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याला एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईत शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार किशोर जाधव, ओंकार यादव, अमित माने यांनी सहभाग घेतला.