पोलीस अधीक्षकांनी गायले गाणे, पोलिसांनी दिली भरभरुन दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:07 PM2019-07-29T14:07:11+5:302019-07-29T14:08:34+5:30

सातारा जिल्हा पोलीस दलाअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक गाणे गायले. थेट एसपींनीच गाणे गाण्यास सुरुवात केल्यामुळे उपस्थित पोलीस अवाक् झाले.

Song sung by the Superintendent of Police | पोलीस अधीक्षकांनी गायले गाणे, पोलिसांनी दिली भरभरुन दाद

पोलीस अधीक्षकांनी गायले गाणे, पोलिसांनी दिली भरभरुन दाद

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांनी गायले तब्बल चार मिनिटे तोंडपाठ गाणेपोलिसांनी दिली भरभरुन दाद

सातारा : जिल्हा पोलीस दलाअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक गाणे गायले. थेट एसपींनीच गाणे गाण्यास सुरुवात केल्यामुळे उपस्थित पोलीस अवाक् झाले.

पोलीस दलात सुमारे १२ वर्षे काम केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस शिपाईवरुन पोलीस नाईक पदावर पदोन्नती करण्यात येते. या पदोन्नतीचा कार्यक्रम रविवारी पोलीस करमणूक केंद्रामध्ये आयोजित करण्यात आला होता.

पदोन्नतीचा कार्यक्रम झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी उपस्थित पोलिसांना प्रत्येकातील जे टॅलेंट आहे ते सादर करण्यास सांगितले. पोलिसांनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी गाणी, विनोद, वेगवेगळे आवाज सादर करत अक्षरश: धम्माल उडवून दिली.


प्रत्येकजण आपली कलाकारी सादरीकरण करत असतानाच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही एखादी कलाकारी सादर करावी, अशी मागणी झाली. यानंतर अधीक्षक सातपुते यांनीही या कार्यक्रमात थेट सहभाग घेत एक गीत गाणार असल्याचे सांगितले. अधीक्षक सातपुते यांनी प्राण जाए वचन न जाए या चित्रपटातील गाणे गायले. तब्बल चार मिनिटे तोंडपाठ गाणे गायल्यानंतर पोलिसांनी त्यांना भरभरुन दाद दिली.


पोलीस अधीक्षकांनी गायले गाणे

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा पोलीस दलाअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक गाणे गायले. थेट एसपींनीच गाणे गाण्यास सुरुवात केल्यामुळे उपस्थित पोलीस अवाक् झाले.
पोलीस दलात सुमारे १२ वर्षे काम केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस शिपाईवरुन पोलीस नाईक पदावर पदोन्नती करण्यात येते. या पदोन्नतीचा कार्यक्रम रविवारी पोलीस करमणूक केंद्रामध्ये आयोजित करण्यात आला होता. पदोन्नतीचा कार्यक्रम झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी उपस्थित पोलिसांना प्रत्येकातील जे टॅलेंट आहे ते सादर करण्यास सांगितले. पोलिसांनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी गाणी, विनोद, वेगवेगळे आवाज सादर करत अक्षरश: धम्माल उडवून दिली.
प्रत्येकजण आपली कलाकारी सादरीकरण करत असतानाच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही एखादी कलाकारी सादर करावी, अशी मागणी झाली. यानंतर अधीक्षक सातपुते यांनीही या कार्यक्रमात थेट सहभाग घेत एक गीत गाणार असल्याचे सांगितले.
अधीक्षक सातपुते यांनी प्राण जाए वचन न जाए या चित्रपटातील गाणे गायले. तब्बल चार मिनिटे तोंडपाठ गाणे गायल्यानंतर पोलिसांनी त्यांना भरभरुन दाद दिली.

Web Title: Song sung by the Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.