एसपींनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:43 PM2019-02-28T12:43:11+5:302019-02-28T12:43:56+5:30

नूतन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच शहर पोलिसांनी तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

As soon as the SP accepts the charge, the proceedings of the proceedings continue | एसपींनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू

एसपींनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू

Next
ठळक मुद्देएसपींनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका सुरूजुगार अड्ड्यावर छापा: पाचजण ताब्यात; सहा हजारांची रोकड जप्त

सातारा: नूतन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच शहर पोलिसांनी तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा), अनिल बापूराव मोहिते (वय २९, रा. सदर बझार), नीलेश युवराज शिंगाडे (वय ३२, लक्ष्मी टेकडी, सदर बझार), विशाल बडेकर (रा. मल्हार पेठ, सातारा), सचिन बजरंग बारटक्के (वय ४८, रा. शाहूपुरी सातारा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

या कारवाया सदर बझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरात दोन ठिकाणी तर वेण्णानगर येथील वेळेकामठीकडे जाणाऱ्या रोडलगत करण्यात आल्या. संबंधितांकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्हा पोलीस दलाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

 

Web Title: As soon as the SP accepts the charge, the proceedings of the proceedings continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.