सोयाबीनचा पेरा वाढला; पण दर पाडला जातो त्याचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:47 AM2021-09-09T04:47:27+5:302021-09-09T04:47:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मागील दोन वर्षांत सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी वाढली आहे. ...

Soybean sowing increased; But what about the rate cut? | सोयाबीनचा पेरा वाढला; पण दर पाडला जातो त्याचे काय ?

सोयाबीनचा पेरा वाढला; पण दर पाडला जातो त्याचे काय ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मागील दोन वर्षांत सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी वाढली आहे. यावर्षी तर ७४ हजार हेक्टरवर सोयाबीन घेण्यात आले आहे. असे असलेतरी आवक वाढली तर व्यापाऱ्यांकडून दर पाडला जातो. त्यामुळे काहींनाच लाभ होतो. तर अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा होऊन जातो.

जिल्ह्यातील खरीप हंगाम सर्वात मोठा असतो. या हंगामातील यंदा जिल्ह्याचे ऊस वगळून सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख १६ हजार ७०१ हेक्टर होते. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक ६४ हजार हेक्टर होते. तर सोयाबीन ६३७५४, भात ४९ हजार, भुईमूग ३८२२७, ज्वारी २४२०३, मका १८५९८, नाचणी ५८८७ हेक्टर असे प्रमुख पिकांचे क्षेत्र होते. गळीतधान्याचे क्षेत्र हे १ लाख ४ हजार हेक्टरवर निश्चित करण्यात आलेले. ही पिके विविध तालुक्यांत पावसाच्या प्रमाणात घेतली जातात. पूर्व भागात बाजरी हेच प्रमुख पीक राहते. त्याचबरोबर मका, सोयाबीन अन् गळीतधान्ये काही प्रमाणात घेतली जातात. तर पश्चिमेकडे भात, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग या पिकांना प्राधान्य दिले जाते.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षात सोयाबीनचे क्षेत्र चांगलेच वाढले आहे. याला कारण म्हणजे सोयाबीनला मिळणारा दर. सध्या तर सोयाबीनला क्विंटलला साडेआठ ते नऊ हजार रुपये दर मिळत आहे. यावर्षी सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ६३ हजारांवर होते. पण, प्रत्यक्षात ७४ हजार हेक्टरवर पेर झाली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ११६ आहे.

शेतकरी सोयाबीनकडे अधिक प्रमाणात वळत आहेत. असे असलेतरी सोयाबीनला कायम चांगला दर मिळणे अपेक्षित आहे. त्यातच सोयाबीन काढल्यानंतर चार पैसे फिटतील म्हणून शेतकरी बाजारात नेतो. पण, तेथे त्याची लूटच होते. कधी आद्रता मोजण्याच्या नावाखाली दर पाडला जातो. तर कधी सोयाबीन खराब आहे म्हणून भावात डावलले जाते. त्याचबरोबर वजन करताना काटा मारण्याचाही प्रकार होतो.

एवढे होत असतानाच बाजारात सोयाबीनची आवक वाढली की दर कमी होतो; मात्र आवक कमी झाली तर दरात वाढ होते हे दिसून आले आहे. यामुळे घरात सोयाबीनची साठवणूक केलेल्या काही शेतकऱ्यांनाच चांगला फायदा होतो.

......................................................................

सोयाबीनचा पेरा (हेक्टरमध्ये) मिळालेला भाव (क्विंटलचा)

२०१७ ७३०४४ २५००

२०१८ ६३३१४ ३०००

२०१९ ६००७५ ३२००

२०२० ७३३१९ ७५००

२०२१ ७४८३९ ८५००

.........................................................

Web Title: Soybean sowing increased; But what about the rate cut?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.