कोरोनाच्या निर्मूलनासाठी सभापती गावोगावी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:12+5:302021-07-05T04:24:12+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच वाढत्या कोरोनाला आळा घालून त्याचे समूळ निर्मूलन करण्यासाठी योग्य ...
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच वाढत्या कोरोनाला आळा घालून त्याचे समूळ निर्मूलन करण्यासाठी योग्य उपाययोजना राबविल्या जाव्यात, यासाठी खंडाळ्याचे सभापती पंचायत समिती आपल्या दारी उपक्रमांतर्गत गावोगावी पोहोचत आहेत. त्यामुळे काही समस्यांचे जागेवरच निरसन होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
तालुक्यातील गावोगावच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना समजून देण्यासाठी पंचायत समिती आपल्या दारी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत सभापती राजेंद्र तांबे, मारुती पवार, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, बांधकाम उपअभियंता एस. डी. हेळकर, भाग शिक्षण अधिकारी गजानन आडे, विस्तार अधिकारी सुनील बोडरे, कृषी अधिकारी दत्तात्रय कचरे यासह अन्य अधिकाऱ्यांनी पहिल्या दिवशी हरळी, घाटदरे, भोसलेवाडी, धावडवाडी या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.
सध्या तालुक्यात कोरोनाची संख्या कमी असल्याने गावांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा मानस सभापतींनी केला आहे. शाळांमधून केलेले विलगीकरण कक्ष, आरोग्य उपकेंद्र व आरोग्याच्या सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय, शालेय पट व मुलांचे ऑनलाईन शिक्षण व त्यात येणाऱ्या अडचणी, लसीकरणाची मोहीम, स्वस्त धान्य पुरवठा या बाबींवर भर देऊन आढावा घेतला जात आहे. शक्य तिथे ताबडतोब उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या जात आहेत.
पहिल्या टप्प्यातील तिन्ही गावांतील हरळीचे सरपंच सुनीता बरकडे, उपसरपंच अनिल बरकडे, ग्रामसेवक संतोष यादव, घाटदरेचे सरपंच रेखा इंदलकर, उपसरंपच धनंजय सोळसकर, धावडवाडीचे सरपंच शबाना दफेदार, उपसरपंच आरफीन पटेल, ग्रामसेवक एस. एन. हाके तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांनी उपस्थित राहून गावच्या परिस्थितीची माहिती दिली .
(कोट)
तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः कोरोनाची स्थिती व उपाययोजना याची माहिती घेऊन आगामी संकटाचा सामना करण्याची तयारी केली जात आहे. कोणत्याही गावची काही अडचण असल्यास त्वरित पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधावा.
-राजेंद्र तांबे, सभापती
................................................
फोटो मेल केला आहे .