Satara: भरधाव कार ट्रकखाली घुसली, कोल्हापुरातील एकजण ठार; एअर बॅग उघडूनही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 01:11 PM2024-07-12T13:11:33+5:302024-07-12T13:13:30+5:30

पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापूरच्या हद्दीत अपघात

Speeding car rammed into truck in Satara, one killed in Kolhapur; Death even with the air bag open | Satara: भरधाव कार ट्रकखाली घुसली, कोल्हापुरातील एकजण ठार; एअर बॅग उघडूनही मृत्यू

Satara: भरधाव कार ट्रकखाली घुसली, कोल्हापुरातील एकजण ठार; एअर बॅग उघडूनही मृत्यू

मलकापूर : महामार्गाकडेला उभ्या मालट्रकला भरधाव कारची पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात कार ट्रकखाली घुसली. या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार तर एकजण जखमी झाला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर कऱ्हाड-कोल्हापूर लेनवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

विष्णू दत्तू सुतार (वय ५५, रा. पिंपळगाव बुद्रूक ता. कागल, जि. कोल्हापूर) असे अपघातात जागीच ठार झालेल्याचे नाव आहे. तर चालक अभिजित शिवाजी मुळे (रा. पिंपळगाव खुर्द ता. कागल जि. कोल्हापूर) असे अपघातात जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे.

मालट्रक (एमएच १३ डी क्यू ९६४६) हा माल भरून कोल्हापूर दिशेला जात होता. पुणे-बंगळूरू महामार्गावर मलकापूर येथे झाडाखालचा वडापाव दुकानासमोर आला असता पंक्चर झाला. चालकाने पंक्चर काढण्यासाठी मालट्रक महामार्गाकडेला उभा केला होता. पंक्चर काढत असताना पाठीमागून मालट्रकला काहीतरी धडकल्याचा आवाज आला. चालकाने पाठीमागे जाऊन बघितले असता, कार (जीए ०५ डी ८५७७) मालट्रकखाली घुसली होती. या अपघातात सुतार याच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. मुळे गंभीर जखमी झाले.

मुळे आणि त्यांचे कर्मचारी सुतार हे दोघे कामानिमित्त पेण येथे गेले होते. काम आटोपून परत गावी जात असताना कारवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला, अशी चर्चा अपघातस्थळी होती. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाल्यामुळे पुणे-कोल्हापूर लेनवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

अपघाताची माहिती महामार्ग देखभाल विभागासह कऱ्हाड पोलिस स्टेशन व महामार्ग पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच देखभाल विभागाचे कर्मचारी व पोलिस तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणुताई उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. कदम क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

एअर बॅग उघडून ही आला मृत्यू..

मलकापुरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात भरधाव कार मालट्रकला धडकल्यानंतर एअरबॅग उघडल्या होत्या. मात्र एअरबॅग उघडून ही बसलेल्या जागेवरच एकाचा मृत्यू झाला.

Web Title: Speeding car rammed into truck in Satara, one killed in Kolhapur; Death even with the air bag open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.