मार्चअखेर सर्व निधी खर्च करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:34+5:302021-03-04T05:14:34+5:30
सातारा : ‘जिल्ह्यात विविध कामे सुरू आहेत तसेच अनेक कामे मंजूर असून, सर्व विभागांनी मार्चअखेर सर्व निधी खर्च करावा,’ ...
सातारा : ‘जिल्ह्यात विविध कामे सुरू आहेत तसेच अनेक कामे मंजूर असून, सर्व विभागांनी मार्चअखेर सर्व निधी खर्च करावा,’ अशी सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी केली. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सर्वांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहनही कबुले यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अध्यक्ष कबुले यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली, यावेळी कबुले बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) मनोज जाधव, अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अध्यक्ष कबुले म्हणाले, ‘जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्वच विभागांनी सतर्क राहून काम करावे. आरोग्य विभागानेही नियोजन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ३१ मार्चपर्यंत कामांवर संपूर्ण निधी खर्च करावा. त्यासाठी अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी पोहोचून आढावा घ्यावा व निधी खर्च होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावेत.’
.................................................