सेवागिरी नगरीत रक्तदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:27+5:302021-07-12T04:24:27+5:30

पुसेगाव : सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगावनगरीत ‘लोकमत रक्ताचं नातं’ या हाकेला पुसेगाव पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ...

Spontaneous response for blood donation in Sevagiri city | सेवागिरी नगरीत रक्तदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

सेवागिरी नगरीत रक्तदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

पुसेगाव : सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगावनगरीत ‘लोकमत रक्ताचं नातं’ या हाकेला पुसेगाव पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सार्वजनिक मंडळे, सामाजिक संघटनांसह महिला आणि युवकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये तब्बल १२६ जणांनी रक्तदान केले.

पुसेगाव येथे ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंती, सेवागिरी देवस्थानचे विश्वस्त रणधीर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार महेश शिंदे, रणधीर जाधव, माजी सरपंच ॲड. श्रीकृष्ण जाधव, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रा. टी. एन. जाधव, सुभाषराव जाधव, अंकुशराव पाटील, राहुल पाटील, बुधचे सरपंच अभयराजे घाटगे, विसापूरचे हरी सावंत यांच्या उपस्थित झाले.

गावोगावच्या सरपंच, उपसरपंच तसेच माजी पदाधिकारी व खटाव उत्तर भागातील कार्यकर्त्यांनी रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदविला.

सातारा येथील बालाजी ब्लड बँक बँकेचे सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वी झाले. हरणाई सहकारी सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, मंडलाधिकारी व्ही. व्ही. तोडरमल गणेश बोबडे, जिल्हा ग्रामसेवक युनियनचे माजी सचिव उद्धव फडतरे, जयदीप गायकवाड, सुरेश चव्हाण, शिवाजी शेडगे, वैभव आवळे, सागर मदने, दशरथ गुरुजी, अविनाश रणशिंग, तानाजी फाळके, शिवाजीराव फाळके, विश्वास फाळके, ज्ञानेश्वर काटकर, मोहन गोडसे, चंद्रकांत गिरी, किरण फडतरे, सचिन फडतरे, अविनाश पाचांगणे, मुगटराव कदम, प्रकाशराजे घाटगे, गणेश सातपुते, अमोल इंगळे, दिलीप फडतरे, श्रीकांत घाडगे यांनी शिबिराला भेट दिली.

चौकट :

गेल्या चार वर्षांपूर्वी भीषण अपघातातून सावरलेल्या वडुजच्या नितीन बुरुंगले यांनी फलटणवरून येऊन तर आत्तापर्यंत ३०वेळा रक्तदान करणारे व आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या नेर गावच्या विलास चव्हाण तसेच कोरोना काळात आघाडीवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका नेहा जाधव यांनी रक्तदान केले.

चौकट

रक्तगट व रक्तदात्यांची नावे ए पॉझिटिव्ह : सूरज कुंभार, प्रवीण जाधव, काशिनाथ रणशिंग, अविनाश चव्हाण, महेश पाचांगणे, शंतनू वाघ, प्रवीण शिर्के, विजय जाधव, किरण येवले, संदीप जाधव, विश्वजित रणशिंग, प्रदीप इंगळे, विक्रम जगदाळे, विकास चव्हाण, उमेश गायकवाड, संकेत गायकवाड, तात्यासाहेब लावंड, अविनाश जाधव, ऋषीकेश लवघारे, मंगेश नलवडे, योगेश शिंदे, सूरज लोटके, दत्तात्रय शेवाळे, नवनाथ खुस्पे, अप्पासो घनवट, अक्तार आत्तार, ओंकार विधाते, राहुल दिडके, रोहन जाधव.

बी पॉझिटिव्ह : शशिकांत शिंदे, सचिन तराने, तानाजी मसुगडे, प्रताप चव्हाण, हर्षवर्धन देशमुख, सुनील चौगुले, वैभव शिंदे, अतुल जगदाळे, किरण काटकर, सागर मदने, रणधीर जाधव, विशाल जाधव, सुसेन जाधव, संदीप घाडगे, रोहित कांबळे, वैभव चव्हाण, विनोद घाटगे, अरविंद कदम, सागर जाधव, प्रकाश घाटगे, अमोल इंगळे, नितीन देशमुख, धनाजी मसुगडे, ऋषीकेश पवार, धैर्यशील फडतरे, राजेंद्र सोनावणे, चंद्रकांत गिरी, परशुराम पुजारी, अक्षय बर्गे, शिवनाथ गायकवाड, करण जगदाळे, गणेश रनखांबे, रविकुमार यादव, तरुणकुमार माळी, महेंद्र देशमुख, राजकुमार फाळके, प्रेम माळी.

एबी पॉझिटिव्ह : नीलेश जाधव, विश्वास काळे, शिवाजी शेडगे, दत्तात्रय घोरपडे, विजय चव्हाण, अक्षय रणशिंग, श्रीकांत पवार, दीपक जाधव, शुभम शेळखे, अनिकेत शिंदे, मचिंद्र भांगरे, सुमित घनवट, सौरभ घनवट, आदित्य मांढरे, श्रीनिवास मुळे, इंद्रजित चव्हाण.

ओ पॉझिटिव्ह : वैभव भोसले, शुभम जाधव, ओंकार जाधव, ऋतिक चव्हाण, ऋषीकेश चव्हाण, शुभम फडतरे, अमर खटावकर, अजित काटकर, विशाल फाळके, रोहन पाचांगणे, श्रीकांत मालिले, स्वप्नील कांबळे, अभय घाटगे, हणमंत शिंदे, स्वप्नील गायकवाड, सुरेश नलवडे, सुनील रणशिंग, नेहा जाधव, रोहन जाधव, विलास चव्हाण, सूरज शिंदे, संजय काटकर, अमृत जाधव, संदेश जाधव, गोविंद राठोड, बबलू यादव, किशोर फाळके, जयदीप शिंदे, विक्रांत जाधव, अतुल मखरे, अल्ताफ इनामदार, अक्षय गायकवाड, अमोल घनवट.

एबी निगेटिव्ह : प्रदीप देशमुख

बी निगेटिव्ह : सुरेश चव्हाण, शिवाजी जाधव, वसीम इनामदार.

ओ पॉझिटिव्ह : कल्पेश भंडारी, नितीन बुरुंगले, संतोष माने, प्रवीण नलवडे.

११पुसेगाव

पुसेगाव येथे ‘लोकमत’तर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेवागिरी देवस्थानचे विश्वस्त रणधीर जाधव उपस्थित होते.

Web Title: Spontaneous response for blood donation in Sevagiri city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.