मलकापुरात कोरोना लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:38 AM2021-04-21T04:38:27+5:302021-04-21T04:38:27+5:30

कोरोना लसीकरणासाठी नगरपालिकेने चांगलीच कंबर कसली आहे. शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याकरिता काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येथील भारती ...

Spontaneous response to corona vaccination in Malkapur | मलकापुरात कोरोना लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

मलकापुरात कोरोना लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

कोरोना लसीकरणासाठी नगरपालिकेने चांगलीच कंबर कसली आहे. शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याकरिता काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येथील भारती विद्यापीठ, विधि महाविद्यालयात व गणेश कॉलनीमधील वुमन्स फॅसिलिटी सेंटर अशी पहिली दोन लसीकरण केंद्रे सुरू केली. लसीकरणासाठी केंद्रामध्ये अविरतपणे कार्य करणाऱ्या पालिकेचे अधिकारी, आशा सेविका, कर्मचारी आणि डॉक्टर, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकांनी शहरातील नागरिकांचे प्रबोधन करत प्रोत्साहन दिले. दोन ठिकाणी सुरू केलेल्या कोविड-१९ लसीकरण केंद्रांत शासनाच्या नियमांचे पालन करून नागरिकांना लसीकरण सुरू आहे.

मलकापुरात कोरोना लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दहा दिवसांत २ हजारपेक्षा अधिक नागरिकांना लसीकरण केले आहे. अजूनही ४५ वयोगटापेक्षा जास्त असलेल्या व लस न घेतलेल्या नागरिकांनी नोंद करून लस घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व मलकापूर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकट

लसीकरण केंद्र व नोंदणी ठिकाण

भारती विद्यापीठ, छत्रपती शिवाजीराजे चौक, मलकापूर

वुमन्स फॅसिलिटी सेंटर, गणेश कॉलनी उद्यान, आगाशिवनगर

Web Title: Spontaneous response to corona vaccination in Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.