शिंगणवाडीत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:34 AM2021-01-22T04:34:57+5:302021-01-22T04:34:57+5:30
चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष राजेश पवार यांनी समितीच्या बैठकीदरम्यान विभागात गावोगावी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याच्या ...
चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष राजेश पवार यांनी समितीच्या बैठकीदरम्यान विभागात गावोगावी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे यांना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच शिंगणवाडी येथून शिबिरास प्रारंभ करण्यात येत असल्याचे डॉ. कुराडे यांनी सांगितले.
शिंगणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पडलेल्या या शिबिरात एकूण १०० ग्रामस्थांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. वयोवृद्ध ज्येष्ठ ग्रामस्थांना प्राधान्य देत यावेळी मधुमेह, रक्तदाब याची मोफत तपासणी करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. अभिजीत पवार, आरोग्यसेवक एस. एस. डोनोलिकर, आरोग्य सेविका व्ही. एस. लाखाडे, आशा स्वयंसेविका धनश्री यादव, वर्षा सोनावले, परिचारिका मंगल नेवगे, अंगणवाडी सेविका भारती पवार, वर्षा पवार, रेखा कोळेकर आदींनी अथक परिश्रम घेतले.
फोटो : २१केआरडी०१
कॅप्शन : शिंगणवाडी, ता. पाटण येथे आरोग्य शिबिरात ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली.