एकपात्री स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:38 AM2021-04-25T04:38:03+5:302021-04-25T04:38:03+5:30

वाई : रोटरी क्लब ऑफ वाई व प्रतीक थिएटर्स यांच्यातर्फे संयुक्तपणे मार्च २०२१मध्ये आयोजित केलेल्या एकपात्री अभिनय स्पर्धेचा निकाल ...

Spontaneous response to a solo contest | एकपात्री स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एकपात्री स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

वाई : रोटरी क्लब ऑफ वाई व प्रतीक थिएटर्स यांच्यातर्फे संयुक्तपणे मार्च २०२१मध्ये आयोजित केलेल्या एकपात्री अभिनय स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेत महाराष्ट्राबरोबरच अमेरिकेतील शिकागो येथील रंगकर्मींनीही सहभाग घेतला. या स्पर्धेत १२५ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेची संकल्पना रोटरीच्या सांस्कृतिक विभागप्रमुख शांता येळंबकर यांची होती. या स्पर्धेत दहा वर्षांखालील गटात अनुक्रमे श्रेया अरनाळे, पुणे, सावनी दाते, पुणे, अनुष्का तंटक, शिरूर, ऋत्विका तुंबाडे, नागपूर, आरोही प्रशांत पोळ, धोम तर विशेष कौतुक पुरस्कार अनिका पराग, सिध्दम सेट्टीवार शिकागो, अमेरिका यांना मिळाला. अठरा वर्षांखालील गटात अनुक्रमे स्नेहा लंघे, शिरुर, सान्वी भाके, पुणे, सलोनी सरतापे, सावनी देशपांडे, सोलापूर, खुल्या गटात वामन जोग, रत्नागिरी, राणी ताकमोघ, सोलापूर, प्रांजल जाधव, कऱ्हाड, काजल जोग, अकोला, महेश चव्हाण, सातारा यांनी यश मिळवले.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी नेत्रतज्ज्ञ डॉ. रुपाली अभ्यंकर आणि नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे माजी सदस्य, ज्येष्ठ रंगकर्मी सतीश शेंडे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात रोटरी क्लबचे अध्यक्ष अजित क्षीरसागर, सचिव डॉ. जितेंद्र पाठक आणि प्रतीक थिएटर्सचे अध्यक्ष सचिन अनपट व सचिव कुमार पवार, रामप्रसाद घाटगे, डॉ. सुनील देशपांडे, आदित्य चौंडे, गायत्री जोशी-पटवर्धन यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Spontaneous response to a solo contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.