पश्चिम भागात तुरळक पाऊस, कोयनेला २४ मिलिमीटर नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 06:03 PM2020-09-10T18:03:08+5:302020-09-10T18:04:15+5:30

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून गुरूवारी सकाळपर्यंत कोयनेला २४ , नवजा ११ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०३.४१ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

Sporadic rainfall in western part, 24 mm recorded at Koyne | पश्चिम भागात तुरळक पाऊस, कोयनेला २४ मिलिमीटर नोंद

पश्चिम भागात तुरळक पाऊस, कोयनेला २४ मिलिमीटर नोंद

Next
ठळक मुद्देपश्चिम भागात तुरळक पाऊस, कोयनेला २४ मिलिमीटर नोंदधरणात १०३ टीएमसीवर पाणीसाठा

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून गुरूवारी सकाळपर्यंत कोयनेला २४ , नवजा ११ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०३.४१ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

जिल्ह्याच्या अनेक भागात रविवारी दमदार पाऊस झाला. यामध्ये ऊस, बाजरी, सोयाबीनसह भुईमुगाचे अधिक नुकसान झाले. यामुळे शेतकरी कोलमडला आहे. मात्र, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले. साताऱ्यासह पूर्व भागात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस होत आहे. तर पश्चिमेकडे मात्र, पावसाचा जोर नाही. तुरळक स्वरुपात पाऊस हजेरी लावत आहे.

गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा २४ मिलिमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ४२२४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे सकाळपर्यंत ११ आणि जूनपासून ४८२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला ९ आणि यावर्षी आतापर्यंत ४७९३ मिलिमीटरची पाऊस झालेला आहे.

सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०३.४१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून कोयना धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
 

 

Web Title: Sporadic rainfall in western part, 24 mm recorded at Koyne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.