वनवडी ग्रामपंचायतीकडून डेंग्यूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:06+5:302021-06-25T04:27:06+5:30
कोपर्डे हवेली : पावसाळ्यात विविध आजारांचा लोकांना सामना करावा लागतो. यासाठी डेंग्यूसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी डासांचा नायनाट ...
कोपर्डे हवेली : पावसाळ्यात विविध आजारांचा लोकांना सामना करावा लागतो. यासाठी डेंग्यूसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी डासांचा नायनाट करण्यासाठी बनवडी ग्रामपंचायतीने मशीनद्वारे फवारणी केली.
कऱ्हाड शहरालगतचे गाव म्हणून बनवडी गावाची ओळख होत आहे. गावात अनेक बाहेरील लोक वास्तव्यास असल्याने लोकसंख्येत वाढ झाली आहे. अनेक लहान-मोठे व्यवसाय सुरू झाले असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी ग्रामपंचायतीने पावसाळ्यात रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राजसारथी काॅलनीच्या परिसरात रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणी करण्यात आली.
यामध्ये ग्रामपंचायतीच्या कर्मचारी सोबत पदाधिकारी सामील झाले होते.
त्यामध्ये सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोठावळे, नरहरी जानराव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचा सहभाग होता.
फोटो २४ कोपर्डे हवेली
बनवडी येथे डेंग्यूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे औषधांची फवारणी करण्यात आली. (छाया : शंकर पोळ)
फोटो ओळ...डेंग्यूसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बनवडी येथे फवारणी करण्यात आली. यावेळी सरपंच प्रदीप पाटील उपसरपंच विकास करांडे.