Satara News: आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर एसटी-कारला भीषण धडक; एक ठार, नऊ जखमी

By जगदीश कोष्टी | Published: March 25, 2023 04:35 PM2023-03-25T16:35:34+5:302023-03-25T16:55:42+5:30

सतीश कार्वे कोळकी : आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर फलटण तालुक्यातील पिंपरदजवळ एसटी व कार यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या ...

ST-car collided head on on Alandi-Pandharpur Palkhi road Satara; One killed, nine injured | Satara News: आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर एसटी-कारला भीषण धडक; एक ठार, नऊ जखमी

Satara News: आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर एसटी-कारला भीषण धडक; एक ठार, नऊ जखमी

googlenewsNext

सतीश कार्वे

कोळकी : आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर फलटण तालुक्यातील पिंपरदजवळ एसटी व कार यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाले. कमल भीमराव यलपले (वय ७०) असे मृत वृद्धेचे नाव आहे. जखमीत एसटीतील पाच विद्यार्थ्यांसह महिला वाहकाचा समावेश आहे. हा अपघात आज, शनिवारी सकाळच्या सुमारास झाला. 

तर चालक मोहन भीमराव यलपल्ले, पुतण्या सोयम यलपले, मुलगा वरद यलपले (सर्व रा. यल्लमड मंगेवाडी, ता. सांगोला) हे कारमधील जखमी झाले. तर एसटीमधील स्वाती बंडू खोमणे (१७, रा. निंबळक), दयानंद सीताराम गावडे (१९, रा. गुणवरे), श्रध्दा सूर्यकात दळवी (१७), आकांशा बापू चव्हाण (१७, दोघी रा. शेरे शिंदेवाडी), पूजा बिपिन निंबाळकर (१७, रा. निंबळक) व महिला वाहक आश्विनी जयराम गोसावी हे जखमी झाले. 

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर गुणवरेहून फलटणच्या दिशेने निघालेली एसटी (एमएच १४ बीटी १२६७) आणि फलटणहून सांगोलाच्या दिशेने चाललेली कार (एमएच १२ डीवाय १५०२) यांची पिंपरद हद्दीतील बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्ती केंद्राजवळ समोरासमोर धडक झाली. यात एक ठार तर नऊ जण जखमी झाले.

याअपघात प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात मोहन भीमराव यलपले व चालक शरद वडगावे यांनी एकमेकांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे तपास करीत आहेत.

Web Title: ST-car collided head on on Alandi-Pandharpur Palkhi road Satara; One killed, nine injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.