एसटी बंद पडली अन् विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 07:35 PM2017-09-22T19:35:22+5:302017-09-22T19:35:26+5:30

ST closed and plantation plant! | एसटी बंद पडली अन् विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण!

एसटी बंद पडली अन् विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण!

googlenewsNext
ठळक मुद्देवेळ सत्कारणी ; कुरणेश्वर समोरील डोंगर हिरवा करण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : एसटी बंद पडली की प्रवाशांची चिडचिड होते. त्यातच तरुण मुलं असतील तर राडा करण्याची भाषा केली जाते. परंतु, साताºयात वेगळाच अनुभव आला. कुसवडे-सातारा एसटी बंद पडली अन् बसमधील विद्यार्थ्यांनी हा वेळ सत्कारणी लावला. कुरणेश्वर मंदिराजवळील अजिंक्यतारा किल्ल्याच्या डोंगरावर वृक्षारोपण केले.

प्रवासादरम्यान एसटी पंक्चर होणे नवीन नाही. परंतु, त्यानंतर प्रवाशांमधून येणारी प्रतिक्रिया वेगवेगळी असते. वेळ वाया जातो, म्हणून चिडचिड करणाºया प्रवाशांना तोंड देण्याची वेळ चालक-वाहकांवर येते. परंतु, साताºयातील घटनेने चालक-वाहकही अचंबित झाले.
कुसवडे-सातारा एसटी कुरणेश्वरजवळ बंद पडली. त्या बसमधून महाविद्यालयीन विद्यार्थी अभिजित पवार, अजय सराटे, किरण दळवी, महेश कदम, नीलेश सराटे, ओमकार शेडगे, संदेश सराटे व इतर विद्यार्थी प्रवास करत होते. ते उतरून चालत निघाले असतानाच डॉ. सतीश भोसले यांनी त्यांना वृक्षारोपणासाठी मदत करण्याचे आवाहन केले.त्याला विद्यार्थ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला. त्यानंतर डॉ. सतीश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कुरणेश्वर ग्रुप व कुसवडे येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कुरणेश्वर समोरील डोंगरावर वृक्षारोपण केले. यावेळी वेगवेगळ्या प्रकारची दीडशे झाडे लावली.यावेळी अभय देशमुख, शंकर सकटे, वामनराव भोकरे, उमेश खंडुजोडे, प्रवीण कदम यांचे सहकार्य लाभले.

फोटो आहे...
२२कुरणेश्वर
साताºयातील कुरणेश्वरच्या समोरील अजिंक्यतारा किल्ल्याच्या डोंगरावर कुरणेश्वर गु्रप व कुसवडे येथील महाविद्यालयीन तरुणांनी वृक्षारोपण केले.

 

Web Title: ST closed and plantation plant!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.