एसटी महामंडळाचे प्रशिक्षण लटकले अन् नोकरीही पुढे गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:12+5:302021-02-16T04:39:12+5:30
सातारा : राज्य परिवहन महामंडळातील शेकडो कर्मचारी दरवर्षी सेवानिवृत्त होतात. तेवढेच नव्याने भरती केले जातात. मात्र गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव ...
सातारा : राज्य परिवहन महामंडळातील शेकडो कर्मचारी दरवर्षी सेवानिवृत्त होतात. तेवढेच नव्याने भरती केले जातात. मात्र गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाला अन् एसटीची चाकं एकाच ठिकाणी थकबली. त्यामुळे भरती केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण लटकले अन् त्यांची नोकरीही पुढे गेली आहे.
राज्य परिवहन महामंडळातर्फे दरवर्षी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. त्यानंतर त्यांना प्रशिक्षण देऊन सेवेत सामावून घेतले जाते. गेल्यावर्षी तर चालकपदासाठी महिलांचीही भरती करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांना नोकरी लागल्याने उत्साहाचे वातावरण होते.
अशातच मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अन् संपूर्ण वाहतूक ठप्प करावी लागली. संसर्गाची भीती असल्याने प्रशिक्षणही बंद करण्यात आले. दरम्यान, सहा ते सात महिने फेऱ्या बंद असल्याने महामंडळाचे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले आहे. त्या कर्मचाऱ्यांनाच वेतन देणे अशक्य असल्याने महामंडळाने ज्यांचे प्रशिक्षण सुरू होते. त्यांना नंतर कळविले जाईल, असे सांगून जाण्यास सांगितले.
एसटी कार्यालयात अजूनही निरोप नसल्याने या कर्मचाऱ्यांना आपली भरती रखडतेय की काय, अशी भीती सतावत आहे. काहींनी तोपर्यंत पर्यायी सोय केली आहे. पण वाहकांना घरीच थांबावे लागले आहे.
जणांनी केले होते अर्ज
जणांची झाली होती निवड
जणांचे प्रशिक्षण पूर्ण
जणांचे प्रशिक्षण अर्धवट राहिले
कोट :
ज्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे, त्यांची नोकरी कोठेही गेलेली नाही. ज्याप्रमाणे जागा रिक्त होतील, त्या प्रमाणात या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात येणार आहे.
- सागर पळसुले
विभाग नियंत्रक
प्रशिक्षण अर्धवट
एसटीत चार महिन्यांचे प्रशिक्षण झाले. त्यामुळे स्वप्न साकारत असतानाच लॉकडाऊन सुरू झाले अन् प्रशिक्षण थांबवले. त्यामुळे आता कधी सुरू होणार, याकडे लक्ष लागले आहे.
- स्वाती मोतलिंग