एसटीची वाहतूक सुरू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:32 AM2021-01-14T04:32:17+5:302021-01-14T04:32:17+5:30
................................... कांद्याचा दर टिकून लोकमत न्यूज नेटवर्क दहिवडी : गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचे दर वाढले आहेत. आठवडी बाजारातही कांदा ...
...................................
कांद्याचा दर टिकून
लोकमत न्यूज नेटवर्क
दहिवडी : गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचे दर वाढले आहेत. आठवडी बाजारातही कांदा ३० ते ५० रुपये किलोपर्यंत मिळत आहे. सध्या कांद्याचे दर टिकून आहेत. त्याचबरोबर भाजीपाल्याचे दर काहीसे कमी झाले आहेत. वांगी, दोडका, कारली यांचा भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे.
....................................
खड्डेमय रस्त्यातून प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातून क्षेत्र माहुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने चालविणे अवघड झाले आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. कृष्णानगर येथील कालव्यापासून कृष्णा नदीच्या पुढील काही अंतरापर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. रात्रीच्यावेळी तर वाहने या खड्ड्यात आदळत असतात. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संबंधितांनी डांबराने खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
.................................................
पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण आवश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : सातारा - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला वृक्षारोपण करणयात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.
सातारा-पंढरपूर मार्ग जिल्ह्यातील कोरेगाव, पुसेगाव, निढळ, गोंदवले, म्हसवडवरुन जातो. या मार्गाच्या बाजूला तीन वर्षांपूर्वी काही प्रमाणात झाडे होती, पण महामार्गाच्या कामाच्यावेळी अनेक झाडे तोडण्यात आली. त्यामुळे सध्या रस्त्याच्या बाजूला अपवादात्मकच झाडे दिसतात. पर्यावरण संतुलनासाठी या महामार्गाच्या बाजूला वृक्षारोपण करून संवर्धन करावे, अशी मागणी होत आहे.
....................................................