व्हेंटिलेटर सुविधेमुळे कोरोना उपचाराला स्थैर्य : मकरंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:39+5:302021-06-02T04:29:39+5:30

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील कोरोनाग्रस्त लोकांना अधिक सोयीस्कर उपचार मिळावेत, यासाठी प्रशासन पातळीवर विविध उपाययोजना सुरू आहेत. तालुक्यात लोणंद, ...

Stabilization of corona treatment due to ventilator facility: Makrand Patil | व्हेंटिलेटर सुविधेमुळे कोरोना उपचाराला स्थैर्य : मकरंद पाटील

व्हेंटिलेटर सुविधेमुळे कोरोना उपचाराला स्थैर्य : मकरंद पाटील

Next

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील कोरोनाग्रस्त लोकांना अधिक सोयीस्कर उपचार मिळावेत, यासाठी प्रशासन पातळीवर विविध उपाययोजना सुरू आहेत. तालुक्यात लोणंद, शिरवळ, खंडाळा या ठिकाणी कोरोना सेंटरमध्ये चांगल्या रीतीने काम सुरू आहे. गंभीर रुग्णांना अधिकचे उपचार मिळावेत, यासाठी ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर सुविधा तयार करीत आहोत. या सुविधेमुळे उपचार पद्धतीला आणखी स्थैर्य मिळेल, असा विश्वास आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.

कोरोनाचा भविष्यातला धोका ओळखून खंडाळा ग्रामीण रुग्णालयात सातारा जिल्हा बँकेच्या निधीतून व आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून चार व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात आले आहेत. या व्हेंटिलेटरचे लोकार्पण करताना ते बोलत होते. या वेळी तहसीलदार दशरथ काळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र कोरडे, डॉ. तात्यासाहेब कोकरे, जिल्हा बँकेचे उपविभागीय अधिकारी अरविंद यादव, संजय मांढरे, मयूर भोसले, प्रवीण पवार उपस्थित होते .

खंडाळा ग्रामीण रुग्णालयात कोरोनासाठी तीस बेडची उपलब्धता आहे. यामध्ये ऑक्सिजन बेडचाही समावेश आहे. मात्र गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र हलवावे लागत होते. आता व्हेंटिलेटरच्या सुविधेमुळे अत्यवस्थ रुग्णांना उपचार मिळण्यास मदत होणार आहे. या वेळी आमदार मकरंद पाटील यांनी रुग्णालयात लोकांना मिळणाऱ्या सुविधा, उपलब्ध मनुष्यबळ व औषधे, स्वॅब तपासणी, लसीकरण मोहीम याबाबतची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.

Web Title: Stabilization of corona treatment due to ventilator facility: Makrand Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.