केळघर घाटात तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:40 AM2021-01-13T05:40:20+5:302021-01-13T05:40:20+5:30

मेढा : सातारा-महाबळेश्वर रस्ता रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. काही ठिकाणी रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास आले असून, वानहधारकांचा प्रवास सुखकर ...

Star exercise in Kelghar Ghat | केळघर घाटात तारेवरची कसरत

केळघर घाटात तारेवरची कसरत

Next

मेढा : सातारा-महाबळेश्वर रस्ता रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. काही ठिकाणी रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास आले असून, वानहधारकांचा प्रवास सुखकर झाला आहे. परंतु, मेढा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटाची अवस्था खोदकामामुळे अत्यंत भीषण झाली आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. रुंदीकरणासाठी घाटरस्ता ठिकठिकाणी खोदण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून होत आहे.

दर उतरल्याने स्ट्रॉबेरीला मागणी

पाचगणी : स्ट्रॉबेरी लॅण्ड म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी फळाला बहर येऊ लागला आहे. ७०० ते ८०० रुपये या दराने विकली जाणारी स्ट्रॉबेरी आता ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो या दराने विकली जात आहे. उत्पादनात हळूहळू वाढ होऊ लागल्याने व दर उतरल्याने पर्यटकांमधून स्ट्रॉबेरीला मागणी वाढू लागली आहे. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि अस्मानी संकटामुळे महाबळेश्वर तालुक्याच्या ४० ते ४५ टक्के क्षेत्रावरच स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे. स्ट्रॉबेरीबरोबरच राजबेरीसुद्धा बाजारपेठेत उपलब्ध झाली आहे. याचे दरही ४०० ते ५०० रुपये प्रतिकिलो इतके आहेत.

ट्रॅक्टरमधील कचरा पुन्हा रस्त्यावरच

सातारा : सातारा पालिका शहर स्वच्छतेसाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे; परंतु कचरा संकलन करणाऱ्या ट्रॅक्टरवर कोणतेही निर्बंध नसल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. काही कर्मचारी ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कचरा भरत असून हा कचरा व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पडत आहे. कचऱ्याने तुडुंब भरणाऱ्या या गाड्या रहदारीच्या ठिकाणाहून पुढे डेपोकडे मार्गस्थ होतात. गाडी डेपोत पोहोचेपर्यंत त्यातील कचरा व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पडते. परिणामी पादचाऱ्यांसह वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. ट्रॅक्टरमध्ये किती कचरा भरावा, याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही.

Web Title: Star exercise in Kelghar Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.