शेरे येथे कोरोना लसीकरणाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:39 AM2021-04-21T04:39:09+5:302021-04-21T04:39:09+5:30

चारुदत्त साळुंखे यांचा कऱ्हाडात सत्कार कऱ्हाड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयटीएस परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावणारा चारुदत्त साळुंखे हा ...

Start corona vaccination at Shere | शेरे येथे कोरोना लसीकरणाला प्रारंभ

शेरे येथे कोरोना लसीकरणाला प्रारंभ

Next

चारुदत्त साळुंखे यांचा कऱ्हाडात सत्कार

कऱ्हाड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयटीएस परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावणारा चारुदत्त साळुंखे हा येथील गाडगे महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. त्याच्या यशाबद्दल अ‍ॅड. रवींद्र पवार यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. सदानंद चिंगळे, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, मोहनराव साळुंखे, उपप्राचार्य एस. के. पाटील, उपप्राचार्य आर. वाय. पाटील, पर्यवेक्षक नांगरे, दत्तात्रय जाधव उपस्थित होते. रयतचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, विश्वजित कदम, किसनराव पाटील, मधुकरराव सावंत, जितेंद्र डुबल, अतुल कदम, फत्तेसिंह जाधव, सचिन पाटील यांनीही त्याचा सत्कार केला.

हिंदू एकताच्या उपाध्यक्षपदी जाधव

पाटण : हिंदू एकता आंदोलनच्या पाटण तालुका उपाध्यक्षपदी केदार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. हिंदू एकताचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विनायकराव पावस्कर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, पाटण तालुका अध्यक्ष तुषार उर्फ गणेश पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवड करण्यात आली. लोकांना येणाऱ्या अडचणी सोडवत हिंदू एकताचे काम सक्षमपणे करेन, असे जाधव यांनी निवडीनंतर सांगितले.

मागासवर्गीय निधीतून तळबीडला साहित्य वाटप

कऱ्हाड : तळबीड, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीतर्फे पंधरा टक्के मागासवर्गीय कल्याण निधीतून चर्मकार समाजाला फायबर खुर्ची व जेवणाच्या टेबलचे वाटप करण्यात आले. खुर्ची पन्नास नग, तर जेवणासाठी बारा टेबल देण्यात आले. सरपंच जयवंत मोहिते, उपसरपंच लालासाहेब वाघमारे, ग्रामविकास अधिकारी प्रमोद ठोके, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत गायकवाड, दुर्गेश मोहिते, दिलीप मोहिते आदींच्या उपस्थितीत वाटप झाले. यावेळी चर्मकार समाजाचे बांधव तसेच आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मागासवर्ग कल्याण खर्चमधून नवबौद्ध वस्तीत स्मशानभूमी परिसरात झालेल्या रस्ता काँक्रिटीकरणाची पाहणी करण्यात आली.

Web Title: Start corona vaccination at Shere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.