सरडे येथे शेतकरी ते थेट ग्राहक सेवेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:36 AM2021-03-07T04:36:01+5:302021-03-07T04:36:01+5:30
फलटण : महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यांतर्गत संत सावता माळी रयत बाजार योजनेंतर्गत सरडे येथे ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत ...
फलटण : महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यांतर्गत संत सावता माळी रयत बाजार योजनेंतर्गत सरडे येथे ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक योजनेचा शुभारंभ करण्यात आला. उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर, सरपंच पूनम चव्हाण, उपसरपंच महादेव वीरकर यांच्या हस्ते सोपान जाधव आणि संतोष जाधव या शेतकऱ्यांना कृषी खात्याकडून छत्री भेट देऊन या अभियानाला प्रारंभ करण्यात आला.
कृषिमंत्री दादा भुसे यांनी ग्रामपंचायतस्तरावर ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्याची संकल्पना मांडली. त्याबाबतची पत्रे कृषी खात्यामार्फत ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच अनुषंगाने या कार्यक्रमात सरपंच पूनम चव्हाण यांना उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर यांनी पत्र सुपूर्द केले तसेच समिती स्थापन करण्याची विनंती केली.
या कार्यक्रमात उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी फिरोज शेख, भारत रणवरे यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. आप्पासाहेब शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सचिन बेलदार-पाटील, राजूभाई शेख, ग्रामसेवक शिवाजी गाढवे, नवनाथ धायगुडे, कुलदीप नेवसे, विशाल मोरे, शशिकांत धायगुडे, यशवंत बेलदार-पाटील, दशरथ बेलदार-पाटील, भालचंद्र जाधव, बाळासाहेब भंडलकर, संतोष जाधव, पोपटराव भोसले, शत्रुघ्न भोसले, मारुती चव्हाण उपस्थित होते.