फलटण तालुक्यात सैनिक स्कूल सुरू करा, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 06:47 PM2022-04-07T18:47:54+5:302022-04-07T18:49:00+5:30

फलटण : फलटण तालुक्यात सैनिक स्कूल सुरू करण्याची मागणी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून खासदार रणजितसिंह ...

Start Sainik School in Phaltan taluka, Ranjit Singh Naik Nimbalkar's demand to Defense Minister Rajnath Singh | फलटण तालुक्यात सैनिक स्कूल सुरू करा, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी

फलटण तालुक्यात सैनिक स्कूल सुरू करा, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी

googlenewsNext

फलटण : फलटण तालुक्यात सैनिक स्कूल सुरू करण्याची मागणी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे. यावेळी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार समाधान आवताडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

केंद्र सरकारने देशात नवीन १०० सैनिक स्कूल सुरू करण्याचे नियोजन केले असून, माढा मतदारसंघात २५ लाख लोकसंख्या असून, सातारा व सोलापूर या दोन्ही जिल्ह्यात हा मतदासंघ विभागला आहे. सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

येथील युवक देशप्रेमाने प्रेरित असून, हजारोच्या संख्येने लोक देशसेवेत सामील आहेत, त्यामुळे येथील युवक सैन्य भरतीसाठी कायमच अग्रेसर असतो. अशा युवकांना योग्य प्रशिक्षण व शिक्षा मिळण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण तालुक्यात सैनिक स्कूल व्हावे, अशी मागणी माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केंद्रीय सरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे.

Web Title: Start Sainik School in Phaltan taluka, Ranjit Singh Naik Nimbalkar's demand to Defense Minister Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.