सातारा ‘फेस्टिव्हल’ला प्रारंभ
By admin | Published: May 18, 2014 12:06 AM2014-05-18T00:06:18+5:302014-05-18T00:07:08+5:30
सातारा : श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘सातारा फेस्टिव्हल’ला येथे दिमाखात प्रारंभ झाला.
सातारा : श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘सातारा फेस्टिव्हल’ला येथे दिमाखात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी ‘आवेझ दरबार’ यांचा जुन्या व नव्या हिंदी गाण्यांचा ‘रूह द बॅन्ड’ हा बहारदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला सातारकरांनी प्रतिसाद दिला. माजी आमदार दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांनी घालून दिलेला सांस्कृतिक चळवळीचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने त्यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेमार्फत २००५ पासून दि. १६ ते १८ मे या कालावधीत भव्य प्रमाणात ‘सातारा फेस्टिव्हल’चे आयोजन केले जात आहे. यंदाच्या सातारा फेस्टिव्हलमध्ये पहिल्या दिवशी भारतासह यू.के., लंडन, दक्षिण आफ्रिका आदी देशांत गाजलेला व नावाजलेला ‘आवेझ दरबार’ यांचा जुन्या व नव्या हिंदी गाण्यांचा ‘रूह द बॅन्ड’ हा बहारदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला सातारकरांचा प्रतिसाद मिळाला. दरम्यान मोफत असणार्या ‘सातारा फेस्टिव्हल’साठी ६० बाय ४० चे भव्य स्टेज उभारले आहे. येथे फ्लाइंग साउंड सिस्टीम, तसेच सुमारे २० हजार रसिक प्रेक्षकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सातारकरांचा यंदाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)