राज्यात ८ जिल्ह्यांतील २२७३ शाळा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:08 PM2018-10-26T23:08:05+5:302018-10-26T23:08:08+5:30

प्रगती जाधव - पाटील / संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा/कोल्हापूर : जिल्हा परिषद शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांना सध्या ...

In the state, 2273 schools in 8 districts are in the dark | राज्यात ८ जिल्ह्यांतील २२७३ शाळा अंधारात

राज्यात ८ जिल्ह्यांतील २२७३ शाळा अंधारात

Next

प्रगती जाधव - पाटील /
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा/कोल्हापूर : जिल्हा परिषद शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांना सध्या अंधारात शिक्षण घ्यावे लागत आहे. वीजबिल भरल्याने आठ जिल्ह्यांतील एकूण १२,१५९ शाळांपैकी तब्बल २२७३ शाळांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात उस्मानाबादमधील सर्वाधिक ८२७ आणि लातूरमधील ६२७ शाळांचा समावेश आहे.
डिजिटल वर्गांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना आयएसओ मानांकन मिळाले. मात्र, दिवसेंदिवस खर्चाचा आकडा वाढू लागला. यात वीजबिल भरण्याचा प्रश्न सर्वांत मोठा होता. याविषयी जिल्हा परिषदेच्या शाळांनी वीजबिलाच्या निधीसाठी जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला; मात्र वीजबिलाची जबाबदारी शाळेची असल्याचे सांगून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली. पदरमोड करून काही महिने मुख्याध्यापकांनी वीजबिल भरलेही; पण त्यानंतर यात खंड पडत गेला. परिणामी राज्यातील अनेक शाळांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.


जिल्हा एकूण वीज
शाळा खंडित
लातूर ११४४ ६२७
उस्मानाबाद १०२७ ८२७
सातारा २७०३ ३२४
कोल्हापूर २८०० ८४
जिल्हा एकूण वीज
शाळा खंडित
वाशिम ७७८ २०५
नागपूर १५३९ १००
धुळे ११०३ ४०
गोंदिया १०६५ ६६

Web Title: In the state, 2273 schools in 8 districts are in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.