माधवी गोसावी व धन्यकुमार तारळकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:36 AM2021-03-06T04:36:41+5:302021-03-06T04:36:41+5:30
फलटण : शैक्षणिक, सामाजिक व साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मानव विकासात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार ...
फलटण : शैक्षणिक, सामाजिक व साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मानव विकासात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातून कांबळेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र, खुंटे येथील शिक्षिका माधवी गोसावी व निंभोरे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मदने नायकुडेवस्ती येथील उपशिक्षक धन्यकुमार प्रल्हाद तारळकर यांची निवड झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील मानव सेवा विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने मानवी विकासात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदा पुरस्कार वितरण सोहळ्याचे तिसरे वर्ष असून, पुरस्कार वितरण सोहळा ११ एप्रिलला लातूर येथील दयानंद सभागृहात सिंधुताई सपकाळ यांच्याहस्ते होणार आहे. माधवी गोसावी व धन्यकुमार तारळकर यांनी कोरोनात शाळा बंद असताना शिक्षण सुरू आकाशवाणी पाठ निर्मिती, टीचर मेंटर या उपक्रमामार्फत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण, ऑनलाईन व ऑफलाईन अध्ययन-अध्यापन आदी उपक्रम राबविले. (वा. प्र.)
फोटो०५मलटण/एडीव्हीटी/न्यूज
नायकुडेवस्ती येथील धन्यकुमार तारळकर हे मुलांमध्ये मिसळून ज्ञानदान करतात.