राज्यस्तरीय विनोदी एकपात्री अभिनय स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:36 AM2021-05-15T04:36:58+5:302021-05-15T04:36:58+5:30
सातारा : कोरोनाचा ताण आज समाजमनावर खूप जास्त आहे. अशावेळी मानसिक ताण कमी व्हायला हवा, या हेतूने पुण्यशील सुमित्राराजे ...
सातारा : कोरोनाचा ताण आज समाजमनावर खूप जास्त आहे. अशावेळी मानसिक ताण कमी व्हायला हवा, या हेतूने पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्ट आणि सातारकर रंगकर्मी यांनी राज्यस्तरीय विनोदी एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केली आहे.
गेलं अख्खं वर्ष एकांकिका, नाटकं आशा बऱ्याच थिएटर ॲक्टिव्हिटी बंद राहिल्या. निदान या स्पर्धेच्या निमित्ताने थोडीशी तरी पोकळी भरून निघेल, या हेतूने ही स्पर्धा घेण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये कोणताही स्पर्धक मराठी भाषेतील एक मिनिटाचे विनोदी स्वगत पाठवू शकतो. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही. या स्पर्धेत स्वगत पाठविण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. ही स्पर्धा सोळा वर्षाखालील व सोळा वर्षांवरील आशा दोन गटांत घेतली जाणार आहे. दोन्ही गटांसाठी अनुक्रमे १०००, ७०० आणि ५०० अशी रोख रक्कम आणि ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तरी जास्तीत-जास्त कलाकारांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन स्पर्धेचे संपर्कप्रमुख बाळकृष्ण शिंदे यांनी केले आहे.