राज्याचे वस्त्रोद्योग धोरण नव्याने ठरणार, सुभाष देशमुख यांची माहिती

By admin | Published: May 3, 2017 08:05 PM2017-05-03T20:05:40+5:302017-05-03T20:05:40+5:30

-

State Textile Industry Policy, New Subhash Deshmukh | राज्याचे वस्त्रोद्योग धोरण नव्याने ठरणार, सुभाष देशमुख यांची माहिती

राज्याचे वस्त्रोद्योग धोरण नव्याने ठरणार, सुभाष देशमुख यांची माहिती

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३ : सन २०१७ ते २०२२ या पाच वषर्त्तसाठी राज्याचे नवीन वस्त्रोद्योग धोरण ठरवण्याची प्रक्रिया सुरू असून या संदर्भात येत्या ११ मे रोजी मंत्रालयात दुसरी बैठक बोलविण्यात आली आहे अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूरात बोलताना दिली़
मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्रामधून राज्यातील कापड उद्योगाला चालना मिळाली, त्यातुन मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी कापूस ते कापड निर्मिती प्रक्रियेवर भर देणारे राज्याचे नवे वस्त्रोउद्योग धोरण तक्रार करण्यात येत आहे़ मंगळवारी मंत्रालयाच्या परिषद सभागृहात राज्य वस्त्रोउद्योग धोरणासंदर्भात पहिली आढावा बैठक पार पडली़ यावेळी वस्त्रोउद्योग प्रतिनिधी उपस्थित होते़ वस्त्रोउद्योग महासंघाच्या प्रतिनिधींनी केलेल्या सुचना आणि उपाय योजनांचा सविस्तर अभ्यास करून नव्या धोरणाचा मसुदा तयार केला जाणार आहे़ त्यावर लोकांच्या सुचना, हरकती मागवून सर्वसमावेशक धोरण ठरवण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री देशमुख यांनी सांगितले़ यापूर्वी सन २०११ ते सन २०१७ या कालावधीसाठी राज्याचे वस्त्रोउद्योग धोरण ठरले होते़ त्यात ४० हजार कोटींची गुंतवणुक आणि ११ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्टे ठेवण्यात आले होते़ प्रत्यक्षात १७ लाख ३०४ कोटीची गुंतवणुक झाली असून २ ालख ६२ हजार रोजगार निर्मिती झाली़ या धोरणाची मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपल्याने ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़ आता नव्या धोरणाची आखणी सुरू आहे़ वस्त्रोउद्योग विभागातील उद्योजक, संघटना यांच्याकडून सुचना, अभिप्राय मागविण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले़

Web Title: State Textile Industry Policy, New Subhash Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.