महिलांवरील अत्याचारासंदर्भात दक्ष नागरिक फाउंडेशनचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:43 AM2021-09-26T04:43:01+5:302021-09-26T04:43:01+5:30

सातारा राज्यात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. ही बाब निश्चितच चिंतनीय असून हे अत्याचार करणाऱ्या नराधमांना लवकरात ...

Statement of Daksh Nagarik Foundation regarding atrocities against women | महिलांवरील अत्याचारासंदर्भात दक्ष नागरिक फाउंडेशनचे निवेदन

महिलांवरील अत्याचारासंदर्भात दक्ष नागरिक फाउंडेशनचे निवेदन

Next

सातारा राज्यात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. ही बाब निश्चितच चिंतनीय असून हे अत्याचार करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर शोधून शिक्षा करावी, अशी मागणी दक्ष नागरिक फाउंडेशनच्या राज्याध्यक्षा सुनीता पाटणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मुंबई, पुणे तसेच सातारा जिल्ह्यांतील जावली आणि नुकतीच महाबळेश्वर येथील घडलेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. महिलांवर अत्याचार करून ते मिटविण्यासाठी गावातीलच काही पुढारी मंडळी प्रयत्न करत आहेत, हे चुकीचे असून, त्यांनाही या प्रकरणात शिक्षा झाली पाहिजे. महिलांना सुरक्षित वातावरण तयार होण्यासाठी प्रशासनाने देखील खबरदारी घेतली पाहिजे. याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.

Web Title: Statement of Daksh Nagarik Foundation regarding atrocities against women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.