ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:18+5:302021-06-25T04:27:18+5:30
फलटण : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी, मागासवर्गीय ...
फलटण : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी, मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांनी पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे तसेच ओबीसींची जातीनिहाय जनगणना ताबडतोब करण्यात यावी व ओबीसी समाजाच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वाटप तातडीने करावे, यासह अनेक मागण्यांसाठी ओबीसी जनमोर्चाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, दादासाहेब चोरमले, सातारा जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष दशरथ फुले, फलटण तालुका पंचायत समितीची माजी सभापती शंकरराव माडकर, फलटण नगर परिषदेचे नगरसेवक अजयकुमार माळवे, विक्रम जाधव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष अमीर शेख, अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष ताजुद्दीन बागवान, ज्येष्ठ नेते डॉ. बी. के. यादव, भारती शिनगारे, युवराज शिंदे, सुभाषराव भांबुरे, किरण बोळे, जाधववाडीचे माजी सरपंच मुनीष जाधव, बाळासाहेब काशीद, सतीश जंगम, रणजित भुजबळ, राजेंद्र भागवत, उद्धव बोराटे, चंद्रशेखर हेंद्रे, राजेश हेंद्रे, बाळासाहेब काशीद, समीरभाई तांबोळी, बाळासाहेब ननवरे, दीपक शिंदे, विकास शिंदे, शरद सोनवणे, सुरज जाधव, सतीश कर्वे, दीपक मदने उपस्थित होते.