तारळी धरण फुल टू सेफ...! जलसंपदा मंत्र्यांकडे अहवाल

By admin | Published: March 21, 2017 08:01 PM2017-03-21T20:01:52+5:302017-03-21T20:01:52+5:30

तारळी धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा अहवाल जलसंपदा खात्याकडे सादर करण्यात आला आहे.

The Stem Dam is Full to Safe ...! Report to the Water Resources Minister | तारळी धरण फुल टू सेफ...! जलसंपदा मंत्र्यांकडे अहवाल

तारळी धरण फुल टू सेफ...! जलसंपदा मंत्र्यांकडे अहवाल

Next
> आॅनलाईन लोकमत
उंब्रज (सातारा), दि. 21 - तारळी धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा अहवाल जलसंपदा खात्याकडे सादर करण्यात आला आहे.  जानेवारी महिन्यात तारळी नदीवरील तारळी धरणाच्या व्हॉल्व्हचा दरवाजा खराब झाल्यामुळे या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांच्यात भीती निर्माण झाली. यांत्रिकी, स्थापत्य विभागाच्या अभियंत्यांनी आपत्कालीन दरवाजा सोडून हा विसर्ग थांबवला होता. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशीअंती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे याबाबत अहवाल सादर करण्यात आला असून, यात तारळी धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे.
दरम्यान, भाजपाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. गणेश इंजेकर यांनी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्याकडे तारळी धरणाच्या सुरक्षिततेबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या आधारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ चौकशीचा आदेश दिला होता. त्या आदेशाने चौकशी पूर्ण झाली असून, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे सहायक अभियंता सु. दि. बारबिंड यांनी तारळी धरणाच्या सुरक्षिततेस कोणताही धोका नाही व धरण पूर्णपणे सुरक्षित आहे, असा अहवाल दिला आहे.
तारळी धरणाच्या तुटलेल्या व्हॉल्व्हची व धरणाच्या सुरक्षिततेबाबत चौकशी करण्याची मागणी करणाºया भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. गणेश इंजेकर यांनी मंत्री, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्रालय मुबंई यांना या बाबतचा चौकशी अहवाल पाटबंधारे विभागाने दिला आहे. या अहवालानुसार तारळी धरणात सिंचन तथा विद्युत विमोचकासाठी ३ द्वारांची उभारणी २००९-०१० मध्ये करण्यात आली आहे. यामध्ये आपत्कालीन द्वार/थोपद्वार, धरण बांधकामामध्ये क्विक क्लोजिंग गेट व अधोबाजूस सिंचनासाठी असलेल्या शाखेवर सेवाद्वाराची उभारणी झाली आहे.
दि. ६ जानेवारी २०१७ रोजी सिंचन तथा विद्युत विमोचकाच्या शीर्घ गतीने बंद होणाºया द्वाराकडे जाणाºया गँलरीमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग होताना दिसून आला. क्विक क्लोजिंग गेटच्या बोनेटमधून पाणी गळती होत असावी, असा प्राथमिक अंदाज करण्यात आला. यावेळी पाण्याचा विसर्ग ४०० क्युसेकच्या वर होता. 
यानंतर तातडीने आवश्यक ती पूर्वतयारी करून यांत्रिकी व स्थापत्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने उर्ध्व बाजूचे आपत्कालीन द्वार या सर्व विभागांच्या अभियंत्यांच्या उपस्थितीत रात्री साडेअकरा वाजता यशस्वीरीत्या सोडून उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले व गँलरीमधील पाण्याची गळती थांबली. याची खात्री केली.  
ही गळती क्विक क्लोजिंग गेटचे बॉनेट कव्हर तुटल्याने झाली असल्याने यामुळे तारळी धरणाच्या सुरक्षिततेस कोणताच धोका नाही. धरण पूर्णपणे सुरक्षित आहे, असे नमूद केले आहे.
तसेच क्विक क्लोजिंग गेट, बोनेट अँड होईस्ट अरेजमेंट आदी घटकांची दुरुस्तीची कार्यवाही यांत्रिकी व स्थापत्य विभागांच्या समन्वयाने लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, असे अहवालात सहायक अधीक्षक अभियंता सु. दि. बारबिंड यांनी म्हटले असल्याची माहिती गणेश इंजेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The Stem Dam is Full to Safe ...! Report to the Water Resources Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.