चोरीसाठी आला, हृदयविकाराने मेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:54 PM2017-11-28T23:54:56+5:302017-11-28T23:55:59+5:30

Stolen, die of heart attack | चोरीसाठी आला, हृदयविकाराने मेला

चोरीसाठी आला, हृदयविकाराने मेला

Next


कºहाड : बंगल्यात चोरी करायला गेलेल्या चोरट्याचा त्याचठिकाणी हृदयविकाराने मृत्यू झाला, तर मृतदेह तेथेच सोडून त्याचे साथीदार पसार झाले. कºहाडनजीक गजानन हौसिंग सोसायटीमध्ये घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कºहाडनजीक गजानन हौसिंग सोसायटीमध्ये जयराम जोशी यांचा बंगला आहे. जोशी हे पॉलिश पेपरचे पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य वितरक असून, बंगल्यातच त्यांनी ‘पायस एंटरप्रायजेस’ नावाचे गोदाम व त्यांचे कार्यालय सुरू केले आहे.संबंधित बंगल्यात कोणीही वास्तव्यास नसते. जोशी नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास बंगल्यात आले असता पोर्चमध्ये कोणीतरी अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता संबंधिताचा मृत्यू झाला असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे जोशी यांनी याबाबतची माहिती कºहाड शहर पोलिसांत दिली. माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, कºहाड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद जाधव यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जोशी यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा कटावणीने उचटकल्याचे दिसून आले. तसेच पहिल्या मजल्यावरील कार्यालयाचा दरवाजाही कटावणीने उचकटण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत होते.
बंगल्याच्या पोर्चमध्ये मृतावस्थेत पडलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केली आहे. तसेच संबंधित व्यक्ती चोर असावी, असा पोलिसांचा कयास आहे. संबंधिताच्या खिशात कºहाडातील एका सिनेमा थिएटरचे रात्रीच्या ‘शो’चे तिकीट आढळले असून, त्यावर तीन व्यक्तींसाठी असा उल्लेख आहे. त्यामुळे या चोरट्यासोबत अन्य दोघे असावेत, अशीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनेची नोंद कºहाड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.
फुटेजसाठी पोलिसांची धावाधाव
जोशी यांच्या बंगल्याच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मात्र, नुकताच तो कॅमेरा बंद पडला असल्यामुळे तेथील हालचाली सीसीटीव्हीत कैद झालेल्या नाहीत. चोरट्याच्या खिशात चित्रपटगृहाचे तिकीट सापडल्यामुळे गुन्हे शाखेचे कर्मचारी मंगळवारी दुपारी संबंधित चित्रपटगृहात सीसीटीव्ही तपासण्यासाठी गेले होते. मात्र, त्याठिकाणी सीसीटीव्हीच नसल्याचे समोर आले आहे.

Web Title: Stolen, die of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा