पोटासाठी मुलगा बनला बहुरुपी, गावोगावी भटकंती : हजरजबाबीपणामुळे ग्रामस्थांची करमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:18 PM2018-05-03T23:18:56+5:302018-05-03T23:18:56+5:30
कोपर्डे हवेली : खेळण्या बागडण्याचे, मौजमजा करण्याचे दिवस सोडून गावोगावी भटकरणारा एक मुलगा सध्या लोककला जिवंत ठेवण्याचे काम करतोय. शिक्षण घेण्याचे, नवं काही तरी शिकण्याचे दिवस असताना तो
शंकर पोळ।
कोपर्डे हवेली : खेळण्या बागडण्याचे, मौजमजा करण्याचे दिवस सोडून गावोगावी भटकरणारा एक मुलगा सध्या लोककला जिवंत ठेवण्याचे काम करतोय. शिक्षण घेण्याचे, नवं काही तरी शिकण्याचे दिवस असताना तो पोटाची खळगी भरण्यासाठी बहुरुपी होऊन गावोगावी भटकतोय.
संजय जाधव हा अवघ्या पंधरा वर्षांचा मुलगा आपल्या चेहऱ्यावरील दु:ख लपवून दुसºयांची करमणूक करीत फिरत आहे. पोटासाठी फिरावे लागत असल्याने त्याचे भविष्य अंधारमय ठरू लागले आहे. चार रुपयापासून दहा रुपयांपर्यंतचे बक्षीस लोक त्याला देतात. गर्दीच्या ठिकाणी हा बाल बहुरुपी लोकांची करमणूक करताना दिसतो. लहानपणात त्याच्यावर बहुरुपी व्यवसायाचे संस्कार झाल्याने तो निर्भीडपणे लोकांच्यात समरस होऊन करमणुकीबरोबर लोककलाही जतन करतो. कºहाड तालुक्यातील गावोगावी त्याची भटकंती सुरू आहे. चेहºयावर हास्य असले तरी पोटाची आग घेऊन रस्तोरस्ती तो फिरताना दिसतो.
बहुरुपी ही कला फार वर्षांपासून चालत आली आहे. ऐतिहासिक कालखंडाचा विचार केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातही या कलेचा उल्लेख आढळून येतो. बहुरंगी बहुरुपी आपल्या बोलण्याच्या आणि अभियानयातून समोरच्याची फिरकी घेतात. त्यांच्या अनेक पिढ्या वंश परंपरागत व्यवासाय करत आल्या आहेत.
सध्याच्या काळात बहुरुपींची पिढी शिकत असल्याचे दिसत असले तरी काहींची मुले शिक्षण सोडून गावोगावी फिरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काही मुलांचे दाखले शाळेत आहेत. मात्र, त्यांची पोटासाठी भटकंती सुरू आहे. कोपर्डे हवेली परिसरात संजय जाधव या मुलाची गावोगावी पायपीट सुरू आहे. त्याच्या बोलण्यातील लकब अनेकांना वेड लावत आहे. हातातील नकली प्लास्टिक बंदूक लक्ष वेधून घेत आहे.
कोपर्डे हवेली, ता. कºहाड येथे बहुरुपी मुलाने ग्रामस्थांची करमणूक केली.