खचलेल्या पुलाला दगडाचा भराव
By admin | Published: March 11, 2017 12:49 PM2017-03-11T12:49:30+5:302017-03-11T12:49:30+5:30
साप-रहिमतपूर वाहतुकीला अडथळा : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
खचलेल्या पुलाला दगडाचा भराव
साप-रहिमतपूर वाहतुकीला अडथळा : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
रहिमतपूर : साप-रहिमतपूर मार्गावरील वेताळ माळ येथील ओढ्यावरी पूल गतवर्षी ओढ्याला आलेल्या पावसाच्या पाण्याचा पुरामुळे खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी या पुलाची पाहणी करून खचलेल्या ठिकाणी दगडे टाकून काम आटोपते घेतले. पुलाला ओबडधोबड दगडाच्या टाकलेल्या भरावामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम विभागाच्या दुलर्क्षामुळे संपूर्ण पुलालाच धोका निर्माण झाला आहे.
गतवर्षी उन्हाळ्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे साप-रहिमतपूर दरम्यानच्या वेताळ माळ येथील ओढ्यावरील पुलाचा भराव वाहून गेला आहे. या पुलाची तत्काळ डागडुजी करावी, अशी मागणी साप ग्रामस्थांनी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली. काही दिवसांनी बांधकाम विभागातून एक-दोन कर्मचारी येऊन बाजूचीच दगडे खचलेल्या ठिकाणी टाकून निघून गेले. खचलेल्या ठिकाणी योग्यपद्धतीने भरावाचे काम न केल्याने पुलालाच धोका निर्माण झाला आहे. पुलाचा बराचसा भाग वाहून गेल्याने वाहनांना ये-जा करताना अडचण येत आहे. त्यामुळे या मधल्या मार्गाने रहिमतपूरला होणारा वाहतूक थांबली आहे.
सध्या उन्हाळा सुरू झाला असून, उन्हाळी पावसात ओढ्याला पावसाच्या पाण्याचा पूर येण्याची शक्यता असते. तत्काळ या पुलाची दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती न केल्यास संपूर्ण पूलच वाहून जाण्याची शक्यता आहे. लाखो रुपये खर्च करून नव्याने बांधलेल्या पुलाची वाट केवळ डागडुजीअभावी लावू नये. अन्यथा याला बांधकाम विभाग जबाबदार असेल. तरी तत्काळ या पुलाची दुरुस्ी करावी, अशी मागणी साप ग्रामस्थांतून होत आहे.