कऱ्हाडला वादळामुळे पाईप कोसळून साडेतीन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:33 PM2021-04-29T16:33:22+5:302021-04-29T16:34:41+5:30
Rain Karad Satara : कऱ्हाड येथील बारा डबरे परिसरातील बायोडेट असोसिएशनच्या जैविक/वैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पाची सुमारे ३०० फूट उंचीची धुरांडी पाईप सोमवार, दि. २६ रोजी रात्री मोठ्या वादळामुळे प्रकल्पालगतच्या झोपडपट्टीवर कोसळली. त्यात मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीत पाच कुटुंबाची मोठी आर्थिक हानी झाली आहे.
कऱ्हाड : येथील बारा डबरे परिसरातील बायोडेट असोसिएशनच्या जैविक/वैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पाची सुमारे ३०० फूट उंचीची धुरांडी पाईप सोमवार, दि. २६ रोजी रात्री मोठ्या वादळामुळे प्रकल्पालगतच्या झोपडपट्टीवर कोसळली. त्यात मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीत पाच कुटुंबाची मोठी आर्थिक हानी झाली आहे.
सतीश सुभाना सकटे यांच्या घरांचे एक लाख रुपये, हिराबाई बाळासो काळे यांच्या घराचे ९० हजार रुपये, नारायण नामदेव काळे यांच्या घराचे सव्वा लाख रुपये, अनिल अरुण खिलारे यांचे एक हजार रुपयांचे व शंकर मोतीराम सावंत यांचे तीस हजार रुपयांचे असे जवळपास अंदाजे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेचा पंचनामा तलाठी संजय जंगम यांनी केला आहे.