एक तुफान अडकलंय लॉकडाऊनच्या साखळदंडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:21+5:302021-06-03T04:27:21+5:30

सातारा : ‘कुणी लस देता का, लस या तुफानाला? स्पॉटबॉयच्या सहवासावाचून, लाईमनच्या प्रकाशावाचून, कॅमेरामनच्या रोलिंगवाचूून, डायरेक्टरच्या अ‍ॅक्शनवाचून एक तुफान ...

A storm is stuck in the chain of lockdown | एक तुफान अडकलंय लॉकडाऊनच्या साखळदंडात

एक तुफान अडकलंय लॉकडाऊनच्या साखळदंडात

googlenewsNext

सातारा : ‘कुणी लस देता का, लस या तुफानाला? स्पॉटबॉयच्या सहवासावाचून, लाईमनच्या प्रकाशावाचून, कॅमेरामनच्या रोलिंगवाचूून, डायरेक्टरच्या अ‍ॅक्शनवाचून एक तुफान अडकलंय लॉकडाऊनच्या साखळदंडात...’ शॉर्टफिल्ममधील हे स्वगत आहे ग्रामीण भागातील कलावंतांच्या भावभावनांच्या हिंदोळ्याचे.

गेल्या दीड वर्षांत कोरोनामुळे सर्वत्रच विस्कळीतपणा आला आहे. याचा फटका मनोरंजन विश्वालाही बसला आहे. कोरोनामुळे सगळी गणितेच बिघडून गेली आहेत. कलेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ग्रामीण भागातील कलावंत मंडळांना याच्या झळा सर्वाधिक सोसाव्या लागल्या आहेत. हे लक्षात घेऊन अंगापूर येथील कलावंत अंकुश कणसे यांनी हे स्वगत शॉर्टफिल्मद्वारे मांडले आहे.

अंकुश कणसे ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. चित्रीकरण बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेकांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्वगत व्यक्त केले. लॉकडाऊनमध्ये तयार केलेली ही शॉर्टफिल्म पाहणाऱ्याला नि:शब्द करतेय. या फिल्मच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांच्या व्यथा थेट कला रसिकांच्या समोर आल्या आहेत.

चौकट :

ग्रामीण भागातील तरूणाईला फटका

गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागातील युवा चित्रीकरणाच्या क्षेत्राकडे वळला आहे. भारी किमतीचे कॅमेरे, चित्रीकरण, निर्मिती, एडिटिंगसाठी आवश्यक साहित्य अनेकांनी खरेदी केले आहे. वेबसिरीज, शॉर्टफिल्म, विवाह सोहळे, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम अशा माध्यमातून हा वर्ग एरवी व्यस्त असायचा. लॉकडाऊनमुळे हे सगळं थांबलं आहे. त्यामुळे छायाचित्रकारापासून कलावंतांपर्यंत सारेच अडचणीत आहेत.

कोट

ग्रामीण भागातील अनेक मुलांनी चित्रीकरणाच्या क्षेत्रात आपले करिअर केले आहे. तरूणांनी कर्ज काढून कॅमेरे, तंत्रज्ञानाचे साहित्य घेण्यासाठी ते गुंतवले. अनेकांची उपजीविका यावरच सुरू होती. लॉकडाऊन सुरू असल्यामुळे त्यांच्यापुढचे संकट अधिक गडद होऊ लागले आहे.

- अंकुश कणसे, कलावंत, अंगापूर

Web Title: A storm is stuck in the chain of lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.