थोरांची गाथा पाचशे व्याख्यानांतून प्रकट -- सागर पवार यांचे राज्यभर चाहते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 05:00 PM2019-10-26T17:00:18+5:302019-10-26T17:00:40+5:30
भावी भाषा, भारदस्त आवाज, आशयाला अनुरूप स्वनिर्मिती तसेच इतिहासाला वर्तमानाची दिलेली जोड यामुळे सागर पवार यांचे चाहते महाराष्ट्रभर विस्तारत आहेत.
लक्ष्मण गोरे ।
बामणोली : आपल्या प्रभावी व्याख्यानातून शिक्षकाचा थोर व्यक्तींविषयी समाजप्रबोधनाचा ध्यास... महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक व विचारवंताची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांनी आपले विचार प्रभावीपणे समाजाच्या तळागाळात पोहोचवले.
या संत महात्म्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊनच व्याख्यानांद्वारे समाजप्रबोधनाचा वसा प्रभावी वक्ते सागर चंद्रकांत पवार यांनी घेतला आहे. सागर पवार यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील. त्यांचे मूळगाव सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली आहे. ते सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या निगुडमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षकी पेशाबरोबरच ते व्याख्यानांद्वारे समाजप्रबोधनही करीत आहेत.
वक्तृत्व व आचरण यातील सुसंगती, अपेक्षित समाज परिवर्तन घडविणारे विचार यामुळे तरुण वर्ग त्यांच्या व्याख्यानाकडे आकर्षित होत आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्रातील प्रमुख वक्ते बनले आहेत. कमी वयात आलेले अनुभवांचे वैविध्य, डोळसपणे समाजाकडे पाहण्याची निसर्गत:च लाभलेली दृष्टी, सखोल परीक्षणात्मक क्षमता, चौफेर वाचन, त्या वाचनाला चिंतनाची जोड त्यामुळे समाजाला नवी दृष्टी, नवा विचार, नवी दिशा देण्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत.
प्र
भावी भाषा, भारदस्त आवाज, आशयाला अनुरूप स्वनिर्मिती तसेच इतिहासाला वर्तमानाची दिलेली जोड यामुळे सागर पवार यांचे चाहते महाराष्ट्रभर विस्तारत आहेत.
- प्रतापगडावर सलग दोनवेळा व्याख्यान
सागर पवार यांनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, शहीद भगतसिंग, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संतचरित्रे तसेच वैचारिक, सामाजिक विषयांवर आधारित पाचशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत. किल्ले प्रतापगड येथील शासकीय शिवजयंती उत्सवात प्रमुख व्याख्याते म्हणून सलग दोनवेळा लाभणारे महाराष्ट्रातील ते पहिलेच वक्ते ठरले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानिमित्त वढू बुुद्रुक येथे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलण्याचा सन्मानही त्यांना लाभला आहे.