गड किल्ल्यांचे संवर्धन करणार सामर्थ्य फाउंडेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:39 AM2021-02-24T04:39:56+5:302021-02-24T04:39:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शिवजयंतीच्या मुहूर्तावर सातारा येथे सामर्थ्य सोशल फाउंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. यावेळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शिवजयंतीच्या मुहूर्तावर सातारा येथे सामर्थ्य सोशल फाउंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. यावेळी संस्थेला मिळालेले प्रमाणपत्र आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. सामर्थ्य सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. गणेश चोरगे यांनी संस्थेची उद्दिष्टे, कार्ये व पदाधिकारी याबाबत माहिती दिली.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, गड किल्ल्यांचे संवर्धन हे सामर्थ्य सोशल फाउंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याचप्रमाणे संस्थेने विविध क्षेत्रांमध्ये समाजोपयोगी कामे करावीत, यासाठी आवश्यक ती मदत व मार्गदर्शन केले जाईल. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. गणेश चोरगे, विक्रम फडतरे, प्रणव पवार, स्वप्नील नलावडे, आरिफ शेख, अमर जगताप, वैभव चंदनशिवे उपस्थित होते.
फोटो नेम : २३सुरुची
फाेटो ओळ : सातारा येथे सामर्थ्य फाउंडेशनच्या उद्दिष्ट पत्रिकेचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.